शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू : पुणे जिल्ह्यात ८९ जागा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:04 IST

महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळामुळे रखडली होती प्रक्रिया 

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ८९ जागांसाठी दिली परीक्षा सोशल मीडियावर राज्यातून सर्व उमेदवारांनी केली चळवळ उभी

पुणे : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जून महिन्यात तलाठी भरतीसाठी उमेदवारांची परीक्षा घेतली. पुणे जिल्ह्यात ८९ जागांसाठी तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परंतु, महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून घेतलेल्या या परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ व संभ्रमाचे वातावरण असल्याने परीक्षा होऊन देखील परीक्षा निकाल व पुढील सर्व प्रक्रिया रखडल्या होत्या. परंतु महाआघाडी सरकारने ज्या-ज्या पदासाठी परीक्षा घेण्यात आल्यात त्याची पक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महापरीक्षा पोर्टलला दिले. त्यानुसार तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया आॅनलाइन व्हावी, म्हणून  तत्कालीन भाजप सरकारने महापरीक्षा पोर्टल सुरू केले. मात्र, तलाठी भरतीसह इतर विभागातील भरतीअंतर्गत परीक्षेचा गोंधळ, चुकीची प्रश्नपत्रिका, सदोष निकाल, उत्तरतालिकांच्या त्रुटी या संदर्भात उमेदवारांनी हरकती घेतल्या. राज्यातून सर्व उमेदवारांनी या संदर्भात सोशल मीडियावर चळवळ उभी केली. विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकाºयांना विधानसभेपूर्वी पोर्टल बंद करण्याचे निवेदन दिले. आचारसंहितेत भरतीप्रक्रिया रखडली, मात्र, विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा पोर्टल बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकाच वेळी तलाठी भरतीसाठी ३ जून रोजी परीक्षा घेतली. परंतु निवडणुका आणि त्यानंतर महापरीक्षा पोर्टल संदर्भात झालेल्या वादामुळे परीक्षेचा निकाल लागण्याची प्रक्रिया रखडली होती.महापरीक्षा पोर्टलच्या वतीने नुकतेच जिल्हानिहाय निकाल शासनाच्या संकेतस्थळांवरून प्रसिद्ध केले आहेत. पुणे जिल्ह्यात ८९ जागांसाठी ही परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जिल्हाधिकाºयांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. निकाल जाहीर होऊन पंधरा दिवस झाले परंतु पुढे काय प्रक्रिया राबविण्यात येणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे..............कागदपत्रांची कडक पद्धतीने छाननी होणारपुणे जिल्हा तलाठी भरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, त्यात मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता आढळली आहे. च्यामध्ये काही उमेदवार हे चुकीच्या पद्धतीने (जसे की डमी उमेदवार बसवून, हायटेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरून किंवा मास कॉपी करून) गुणवत्ता यादीत आले असल्याचा आरोप स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने केला आहे. च्या संदर्भात प्रशासनाने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची अत्यंत कडक पद्धतीने छाननी करून मुलाखती घ्याव्या, अशी मागणी परिषदेच्या वतीने करण्यात आली. .............उमेदवारांच्या कागदपत्रांची लवकरच छाननीजिल्ह्यात तलाठ्यांच्या ८९ जागांसाठी जून महिन्यात परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल महापरीक्षा पोर्टलच्या वतीने नुकताच जाहीर केला आहे. आता उमेदवारांच्या कागदपत्रांची मागणी महापोर्टलकडे केली असून, ती प्राप्त झाल्यानंतर पुढील आठवड्यात पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करणार आहे. त्यानुसार उमेदवाराच्या मुलाखती घेण्यास सुरुवात होईल.-विवेक जाधव, तहसीलदार, महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय...............

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षा