शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला धक्का! मुख्यमंत्र्यांचा आदेश झुगारला; सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:25 IST

अविश्वास ठराव दहा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला

ठळक मुद्देसभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव केला होता दाखल

राजगुरुनगर : राज्यात महाआघाडी सरकार असताना खेड तालुक्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेची भक्कम फळी फोडत वाघाला घायाळ करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंनी खासदार संजय राऊत यांना 'खेड मोहिमे'वर पाठवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला गर्भित इशारा दिला होता. आता याच शिवसेनेच्या सभापतींवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर बुधवारी मतदान होत आहे. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सदस्यांना महत्वाचा आदेश दिला आहे. 

शिवसेनेच्या सदस्यांनी व्हीप झुगारुन शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मतदान केले. पोखरकर यांच्या विरुध्द दाखल केेलेला अविश्वास ठराव दहा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला. सभापती पोखरकर न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी मतदान सहभाग घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला नसल्यामुळे मतदानास उपस्थित राहिले नाही.

आज विशेष सभेचे पंचायत समितीमध्ये आयोजन करण्यात आले होते. ठरावावर पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली. सभागृहात अविश्वास ठराव मांडण्यात आला. यावर मतदान घेण्यात आले अमोल पवार, ज्योती आरगडे ,मच्छिंद्र गावडे यांनी ठरावाच्या विरोधी मतदान केले. शिवसेनेच्या सुनिता सांडभोर, वैशाली जाधव , सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, अंकुश राक्षे आणि राष्ट्रवादी चे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे, व भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली होती. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर अविश्वास ठराव घेण्याच्या  निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी बुधवारी १८ आँगस्टला अविश्वास ठरावाची सभा घेण्याबाबतचे आदेश जारी केले होते. 

आम्ही राजकीय सहलीवर असताना भगवान पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये काही सदस्य जखमी झाले. जीवघेणा हल्ला करून ही पक्ष सांगत असेल सभापतीच्या बाजुने मतदान करा. न पटणारे असुन आम्ही ठरावाच्या विरोधात मतदान केले. पक्षानी व्हीप बजावला असला तरी आम्ही सदस्य शिवसेनेचे आहोत, यापुढे आम्ही शिवसेना पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे अंकुश राक्षे व शिवसेनेच्या सदस्यांनी सांगितले. 

टॅग्स :KhedखेडCourtन्यायालयShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcollectorजिल्हाधिकारी