अखेर वकीलचं सरसावले कोव्हिड सुरक्षेसाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:13 IST2021-03-10T04:13:25+5:302021-03-10T04:13:25+5:30
पुणे : वेळ सकाळी 12 वाजताची...आठवड्याची सुरूवात असल्याने सह धर्मादाय कार्यालयात पक्षकारांची प्रचंड गर्दी झाली होती..आवश्यकता नसेल तर कार्यालयात ...

अखेर वकीलचं सरसावले कोव्हिड सुरक्षेसाठी...
पुणे : वेळ सकाळी 12 वाजताची...आठवड्याची सुरूवात असल्याने सह धर्मादाय कार्यालयात पक्षकारांची प्रचंड गर्दी झाली होती..आवश्यकता नसेल तर कार्यालयात येऊ नये असे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी वारंवार करूनही एका केससाठी सुमारे तीन ते चार पक्षकार फक्त पुढची तारीख घेण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात आले होते. या ठिकाणी एकूण पाच न्यायालये आहेत. थर्मल गनने शारीरिक तापमान तपासणी व अभ्यागत नोंदणीसाठी प्रवेशद्वारावर प्रचंड झुंबड उडाली. त्यामुळे तपासणीचे काम करणा-या कार्यालयीन कर्मचा-यांवर प्रचंड ताण आला. अखेर येथील पब्लिक ट्रस्ट प्रँक्टीशनर्स असोसिएशनच्या वकिलांनी पुढाकार घेऊन तपासणी कार्य स्वत:च्या हातात घेतले.
असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. मोहन फडणीस यांनी थर्मल गनद्वारे तपासणीची मोहीम स्वत: हाती घेतली. अध्यक्ष अँड. मुकेश परदेशी यांनी अभ्यागत नोंदणीचे काम सांभाळले. अँड. हेमंत फाटे व अँड. विजय टिळेकरांनी गर्दी नियंत्रित करून सॅनिटायझर वापरून व मास्क लावूनच पक्षकार आत प्रवेश करतील याची देखरेख करून कामकाज सुरळीत केले.
----------------------------
सर्वांच्या हितासाठीच सुरक्षा नियम
सर्वांनाच कामासाठी घराबाहेर पडावे लागते. सरकारी कार्यालय असल्याने अभ्यागतांना प्रवेश नाकारता येत नाही. परंतु, कोव्हिड प्रतिबंधक किमान नियमांचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक आहे. तसेच वकील, अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांना 'फ्रंटलाईन वर्कर्स' समजून या सर्वांना कोव्हिड लस प्राधान्याने देण्यात यावी.
- अँड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे
-----------------------