शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 2:17 AM

पाच जणांना अटक : २४ लाख हस्तगत; मार्केट यार्ड पेट्रोलपंपाची लूट

पुणे : मार्केट यार्ड येथील पेट्रोलपंपावर जमा झालेली २७ लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाºया ५ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली असून, त्यांच्याकडून २४ लाख १२ हजार १५० रुपये हस्त करण्यात आले आहेत़आहद अन्वर सय्यद (वय २२), साकीब मेहबूब चौधरी ऊर्फ लतील बागवान (वय २०), तौसिफ ऊर्फ मोसीन जमीर सय्यद (वय २३) जमीर अहमद हुसेन सय्यद (वय ५९, चौघेही रा़ संतोषनगर, कात्रज) आणि सूरज ऊर्फ मोटा ऊर्फ दस्तगीर शमशुद्दिन यालगी (वय १९, रा़ टिळेनगर, कोंढवा रोड, कात्रज) अशी त्यांची नावे आहेत़अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे यांनी माहिती दिली़ धनकवडी भागातील शंकरमहाराज मठाशेजारी असणाºया पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़ त्या वेळी दोन तरुणांनी हत्याराचा धाक दाखवून ही रोकड लुबाडून नेली होती़ पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, माहिती यावरून गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. त्या वेळी गुन्हा केल्यानंतर सर्व जण बंगळुरू, हैदराबाद, हुमणाबाद, गुलबर्गा व इतर शहरांत पळून जाऊन वास्तव्य करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चेन्नई, गुलबर्गा येथे जाऊन अटक केली. या सर्वांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२ ते १५ हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात लुबाडलेली २४ लाख १२ हजार १५० रुपयांची रोकड जप्त केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे, शकुर सय्यद, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, अतुल साठे, अनिल घाडगे, अशोक भोसले, गुणशिंलन रंगम, रोहिदास लवांडे, राजू रासगे, महेंद्र पवार, गजानन गनबोटे, अनिल भोसले, शिवानंद स्वामी, आजिनाथ काळे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, सुजित पवार, संदेश निकाळजे, नागेश माळी, नीलेश देसाई यांनी कारवाईत भाग घेतला.दस्तगीर यालगी हा ४ महिन्यांपूर्वी पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोलपंपावर गेला होता़ त्या वेळी सोमवारी तेथे जास्त प्रमाणात कॅश जमा होत असल्याचे त्याने पाहिले होते़ यावरून त्याला ही रक्कम लुटण्याची कल्पना सुचली़ त्यानंतर त्यांनी यासाठी संपूर्ण ड्रेस नव्याने खरेदी केले़ सीम कार्ड, मोबाईल, हँडसेट खरेदी करून मोटारसायकल चोरली होती़ त्यानंतर दोन ते तीन सोमवारी त्यांचा हा प्लॅन फसला होता़ साकीब मेहबूब चौधरी याने २६ मार्च रोजी टेहळणी करून पेट्रोलपंपावरील लोक कधी बाहेर पडतात, याची वाट पाहत थांबला होता़ ते बाहेर पडताच मोटार आडवी घालून त्यांच्या मोटारीला अडवून पुढे नेले होते़ त्यांची मोटार कोंढवा बिबवेवाडी रोडवर आल्यावर दुचाकीवरील दोघांनी हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड घेऊन ते पसार झाले होते़ ते देहूरोडला गेले़तेथून ते बंगळुरू, हुमणाबाद, गुलबर्गा येथे गेले़ तौसिफ सय्यद याला अटक केल्यावर त्याने यातील रोकड हैदराबाद येथे एअर होस्टेस असलेल्या बहिणीकडे व वडील जमीर हुसेन सय्यद यांच्याकडे दिली असल्याचे सांगितले़ बहिणीने दुसºयाकडे ठेवायला दिलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली़ मुलाला अटक केल्याचे समजताच जमीर सय्यद हे कुटुंबासह कर्नाटकात पळून गेले होते़ त्यांना चेन्नईजवळ असलेल्या नेल्लोर येथून ताब्यात घेतले व देहूरोड येथे ठेवलेली रक्कम जप्त करण्यात आली़

टॅग्स :Robberyदरोडा