चित्रपट जतन अधिकारी किरण धिवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:47+5:302021-07-23T04:08:47+5:30

धिवार यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. गुरूवारी पहाटे ३.३० वाजता त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. कुटुंबीयांनी रुग्णालयात नेण्यासाठी ...

Film preservation officer Kiran Dhiwar dies of heart attack | चित्रपट जतन अधिकारी किरण धिवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चित्रपट जतन अधिकारी किरण धिवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

धिवार यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. गुरूवारी पहाटे ३.३० वाजता त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. कुटुंबीयांनी रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यामुळे निवासस्थानीच त्यांची प्राणज्योत मालवली.

धिवार हे गेल्या तीस वर्षांपासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे कार्यरत होते. एप्रिल १९९१ मध्ये सर्वप्रथम ते व्हिडिओ टेक्निशियन म्हणून रुजू झाले. त्यानंतर १ जून १९९८ मध्ये ते चित्रपट जतन अधिकारी झाले. व्हिडीओ कॅसेट, डीव्हीडी, डिजिटल या सर्वांचे ते उत्तम जाणकार होते. या सर्व स्थित्यंतरांचे ते साक्षीदार ठरले. शांत स्वभाव आणि सर्वांना नेहमीच सहकार्य करणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘किरण धिवार हे एक समर्पित आर्काइव्हिस्ट होते. त्यांना एनएफएआयमधील चित्रपट संकलनाबद्दल परिपूर्ण ज्ञान होते. त्यांनी विविध चित्रपट प्रॉडक्शन हाऊसशी चांगले संबंध निर्माण केल्यामुळे एनएफएआयला बरेच चित्रपट जतन करण्यासाठी मिळू शकले. त्यांच्या निधनाने वैयक्तिक आणि संस्थात्मक नुकसान झाले आहे.’

Web Title: Film preservation officer Kiran Dhiwar dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.