तेरा जानेवारीपासून चित्रपट महोत्सव
By Admin | Updated: December 24, 2016 00:23 IST2016-12-24T00:23:47+5:302016-12-24T00:23:47+5:30
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ ते १९ जानेवारी

तेरा जानेवारीपासून चित्रपट महोत्सव
पिंपरी : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ ते १९ जानेवारी २०१७ या कालावधीत होणार आहे. पर्यावरण या संकल्पनेवर या वर्षीचा महोत्सव आधारित असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवामध्ये ९५ देशांमधून १००० हून जास्त चित्रपटांनी सहभाग नोंदविला आहे. महोत्सवांतर्गत चिंचवडमधील बिग सिनेमात दोन स्क्रिनवर ४६ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या वेळी फोक्स, स्पर्धात्मक, ग्लोबल व अदर्स या विभागातील चित्रपट प्रदर्शित होतील.
महोत्सवात तरुण वर्गांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. तसेच पुढील वर्षी ंिपंपरी-ंिचंचवडमधील शॉर्ट फिल्मचाही समावेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली. परिषदेस माधुरी बोगावत, प्रवीण तुपे व सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)