कचरा व्यवस्थापनावर भर

By Admin | Updated: February 13, 2017 02:32 IST2017-02-13T02:32:27+5:302017-02-13T02:32:27+5:30

आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वचननाम्याचे प्रकाशन रविवारी झाले़ या जाहीरनाम्यामध्ये पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन

Fill the waste management | कचरा व्यवस्थापनावर भर

कचरा व्यवस्थापनावर भर

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वचननाम्याचे प्रकाशन रविवारी झाले़ या जाहीरनाम्यामध्ये पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, मलनि:सारण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षित पुणे, पर्यावरण संवर्धन, झोपडपट्टी विकास, तळजाई टेकडीवर २०० एकरांत भव्य आॅक्सिजन पार्क, वाय-फाय झोन असा २१ कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून तो येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे़
काँग्रेसच्या या वचननाम्याचे प्रकाशन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अ‍ॅड़ अभय छाजेड, गोपाळ तिवारी, आबा बागुल आदी उपस्थित होते़
पुढील ५ वर्षांत झोपडपट्टी निर्मूलन करण्याकरिता एसआरए अंतर्गत ५०० चौरस फुटांची घरे मिळावीत, यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ झोपडपट्टीतील लहान मुले गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी पोलीस खात्याच्या मदतीने समुपदेशन केंद्र सुरू करणाऱ दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महापालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची तरतूद करणाऱ पुण्यात आलेल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि अभ्यासिका व इतर सुविधा पुरविण्यात येतील़ मुळा-मुठा सुशोभीकरण्याचा कार्यक्रम आखण्यात येईल़ सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक बँ्रड एम्बेसेडरची नियुक्ती करण्यात येईल़
रस्त्यावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पोलीस ठाण्यात व वाहतूक विभागाला जोडण्यात येतील़ महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये १ फायर स्टेशन देणाऱ जुन्या तालीम पुनर्जीवित करण्यासाठी विशेष निधी, कोथरूड येथील शिवसृष्टी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणाऱ महिला बचतगटाला मोकळ्या जागेमध्ये मार्केट बाजाराकरिता जागा उपलब्ध करू. ज्येष्ठांसाठी विशेष हेल्पलाईन, आठवडे बाजार व पथारीवाल्यांसाठी मिनी मार्केट, मजूरअड्ड्यावर सोयीसुविधा, कचऱ्यापासून तयार होणाऱ्या मिथेनॉल या इंधनाच्या घरगुती गॅससाठी प्रायोगिक तत्त्वावर वापर करणाऱ १०० टक्के घरपट्टी थकबाकी वसूल करणार, शहरातील विविध भागात मोफत वाय-फाय सेवा देणार, अशी विविध आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत़ यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे शहराचा आजवरचा विकास हा काँग्रेसमुळेच झाला आहे़ शहर सर्व दृष्टीने सुज्ज आणि संरक्षित व्हावं़ विकासामध्ये सर्वांचा सहभाग असावा, या दृष्टीने हा वचननामा तयार करण्यात आला आहे़ विविध खेळ, खेळाडू यांना मध्यवस्तीत वसतिगृह उभारण्याचा प्रयत्न आहे़ वर्किंग वूमनसाठी होस्टेल उभारले जाईल, असे विश्वजित कदम यांनी सांगितले़

Web Title: Fill the waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.