शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथे मतदान केंद्रावर मोबाईल द्वारे चित्रीकरण, एकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 19:23 IST

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी घातलेली असतानाही मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  

लोणी काळभोर : निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी घातलेली असतानाही शिरूर लोकसभा मतदारसंघातील थेऊर ( ता. हवेली ) येथील केंद्रात मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  शासकीय आदेशाचे उल्लंघन केले म्हणून चित्रीकरण केलेल्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             लोणी काळभोरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , याप्रकरणी अशोक केशव देशमुख ( वय ४८, रा. मु. पो. नळवणे, ता. जुन्नर, जि. पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण रामभाऊ काकडे ( रा. थेऊर, ता. हवेली ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख हे जुन्नर तालुक्यातील खटकाळे येथे असलेल्या शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची लोकसभा निवडणुकीत थेऊर येथील केंद्र क्रमांक ३१३ येथे केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसेच त्यांंच्यासोबत सहकारी म्हणून शितल सुरेश गोरे, आनंद नारायण संत, नारायण बबन पडवळ, दत्तात्रय रामदास शिंदे व बिरा मारूती गुलदगड यांची नेमणूक करण्यात आली होती.           मतदानाच्या दिवशी २९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारांस मतदार यादीतील क्रमांक १२५ मधील मतदार किरण काकडे हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आला. यावेळी त्याने त्याने मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असूनही व मतदान प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण केले. यांमुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन व मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला. म्हणून देशमुख यांनी त्यांचेविरोधात फिर्याद दिली आहे.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVotingमतदान