माजी सभापतीच्या विरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 25, 2015 03:38 IST2015-10-25T03:38:17+5:302015-10-25T03:38:17+5:30
निवडणूककाळात मतदाराला दमदाटी केल्याबद्दल इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद भिगवण पोलीस

माजी सभापतीच्या विरोधात गुन्हा दाखल
भिगवण : निवडणूककाळात मतदाराला दमदाटी केल्याबद्दल इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद भिगवण पोलीस ठाण्यात करण्यात आली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रचारकाळात मतदाराला दमदाटी केल्याबद्दल रमेश जाधव यांच्या विरोधात अविनाश सुधाकर गिते यांनी तक्रार दाखल केली. प्रचार रॅली सुरूअसताना मतदाराला दरडावून आपल्या विरोधात काम करू नको, पॅनल टू पॅनल मतदान कर, अशी धमकी दिली. त्यामुळे विरोधी गटाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये जमा होऊन जाधव यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी शंकरराव गायकवाड, विक्रम शेलार, प्रदीप वाकसे, महेश शेंडगे, संदीप वाकसे, आन्ना धवडे, मोहन शेंडगे, जयदीप जाधव, रोहित माडगे, प्रसाद क्षीरसागर यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ भिगवण पोलीस स्टेशनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यादव यांनी, आपण याविषयी योग्य ती कारवाईच्या आश्वासना नंतर तणाव कमी होऊन कार्यकर्ते प्रचार फेरीकडे दाखल झाले. (वार्ताहर)