महेश मोतेवारच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:29 AM2018-06-11T02:29:52+5:302018-06-11T02:29:52+5:30

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रमुख महेश मोतेवार यांच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे.

filed a chargesheet against the Mahesh Motewar's son & other accused | महेश मोतेवारच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल

महेश मोतेवारच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल

Next

पुणे - गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रमुख महेश मोतेवार यांच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले आहे.
अभिषेक महेश मोतेवार (वय २१, रा. गणराल हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी) असे महेश मोतेवार यांच्या मुलाचे नाव असून त्यांच्यासह भाचा प्रसाद किशोर पारसवार (वय ३२, रा. कृष्णामाई सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी), महेंद्र वसंत गाडे आणि सुनीता किसन थोरात अशा चौघांवर हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. तब्बल ७ हजार २१२ पानांचा समावेश असलेल्या या दोषारोपपत्रात तपासाचे अनेक मुद्दे मांडले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार व त्यांची पत्नी लीना या दोघांना यापूर्वीच अटक केली आहे. सध्या ते दोघेही तुरुंगात आहेत. फसवणुकीच्या या प्रकरणात आतापर्यंत सुमारे २० जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. किरण शांतिकुमार दीक्षित (वय ५३, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मोतेवार व त्यांच्या सहकाऱ्यानी गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने हजारोंची फसवणूक केली. ३० जुलै २०१५ ते २८ सप्टेंबर २०१६ या कालावधीत समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या रकमेचा संचालकांनी बेकायदेशीररीत्या ३० जुलै २०१५ ते २८ सप्टेंबर २०१६ या कालावधीत कायद्यासाठी अपहार करून फिर्यादीसह इतरंचा गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सोसायटीकडे विश्वासाने गुंतवणूक केलेल्या रकमेचा अपहार केला. या गुन्ह्यात तब्बल २ कोटी १८ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक झाली. अभिषेक महेश मोतेवारांचा मुलगा आहे. वैशाली मोतेवार यांनी मुलाच्या मदतीने समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर मल्टिस्टेट नागरिकांकडून पैसे घेतले; पंरतु त्याचा मोबदला दिला नाही.

मोतेवार यांच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया कंपनीला सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यास बंदी घातली. त्यावेळी सोसायटीमार्फ त गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यात आली होती. याप्रकरणी भादंवि कलम ४०९, ४०६, १२० (ब), ४२०, ३४ तसेच महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ज्योती क्षीरसागर यांनी हे आरोपपत्र दाखल केले.

Web Title: filed a chargesheet against the Mahesh Motewar's son & other accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.