शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

औंध येथील राम व मुळा नदीच्या संगमावर अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:42 IST

अनिर्बंध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते आणि शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात.

ठळक मुद्देजीवितनदीच्या सदस्यांनी पकडले रंगेहाथ : एकाला अटक

पुणे : नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा केल्याचा प्रकार एसटीपी, औंध येथे रामनदी व मुळा नदीच्या संगमावर शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला होता. तेव्हा नदी संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देऊन संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करायला भाग पाडलेे. नदीला वाचविण्यासाठी नागरिक पुढे आल्याने यापुढे अवैध वाळू उपशावर आळा बसू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून रामनदी व मुळा नदी पात्रातून वाळू अवैधरित्या घेऊन जात असल्याची माहिती जीवितनदीच्या सदस्या वैशाली पाटकर यांना समजली. त्यामुळे त्यांनी त्यावर लक्ष ठेवून शुक्रवारी रात्री वाळू नेताना संबंधिताला पकडले. त्यानंतर पोलीसांना बोलावले व गुन्हा दाखल करायला भाग पाडले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी विजयकुमार छक्कम साव (वय २२, रा. टाकळी हाजी,  मूळ रा. झारखंड), असे अटक आरोपीचे नाव आहे. साव याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वैशाली जयंत पाटकर (वय ४७, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. बांधकामासाठी वाळूचा वापर होत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. परिणामी नदी पात्रातील अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे.  अनिर्बंध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते आणि शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. अनिर्बंध वाळू उपसा करू नये म्हणून सरकारने काही नियम केलेले असतात. पण, या व्यवसायात अक्षरश: वाळुमाफिया तयार झाले आहेत.  

वाळू उपशाचा नदी पात्रावर परिणामनदीपात्रात वाळू उपसा केल्यामुळे नदीची मोठी हानी होते. तसेच नदीपात्र आणि तिथल्या परिसंस्थेवर वाईट परिणाम होतात. नदीतून वाळूचा उपसा केल्यामुळे नदीच्या पाण्याच्या वेगात बदल होतो.  पाण्याचा वेग वाढतो आणि त्यामुळे वाळू उपसा झालेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूला (उगमाच्या दिशेने) किंवा खालच्या बाजूला नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर झीज होते. याचा परिणाम नदीकिनारे आणि जवळपासच्या भागातही पाहायला मिळतात.  

टॅग्स :PuneपुणेsandवाळूPoliceपोलिसriverनदी