लढतींनी फेडले डोळ्यांचे पारणे
By Admin | Updated: March 23, 2017 04:31 IST2017-03-23T04:31:41+5:302017-03-23T04:31:41+5:30
खराडीगावाचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव उत्साहात पार पडला. यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यातील प्रेक्षणीय

लढतींनी फेडले डोळ्यांचे पारणे
चंदननगर : खराडीगावाचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव उत्साहात पार पडला. यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यातील प्रेक्षणीय लढतींनी कुस्तीशौकिनांची मने जिंकली. देशाच्या कानाकोपऱ्यांतून पहिलवान आले होते.
दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी श्रींची संदल मिरवणूक काढण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम झाला.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता कुस्त्यांना सुरुवात झाली. शेवटची कुस्ती रात्री दहा वाजता संपली.
यात्रेत एकूण ७७ कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी २ हजारांपासून दोन लाख रुपयांची बक्षिसे निकालासाठी ठेवण्यात आली होती. ग्रामस्थांनी सर्व कुस्त्या निकाली सोडविल्या.
अण्णासाहेब पठारे, बापूसाहेब पठारे, दिलीप पठारे, महादेव पठारे, भाऊसाहेब पठारे, बापू वसंत पठारे, पप्पू गरूड, राहुल पठारे, गुलाब पठारे, धीरज पठारे, बाळासाहेब राजगुरू, शरद पठारे, रामदास दरेकर, संजय राजगुरू उपस्थित होते.
(वार्ताहर)