सणसवाडीत फटाके वाजवण्यावरून मारामारी
By Admin | Updated: August 8, 2015 00:47 IST2015-08-08T00:47:14+5:302015-08-08T00:47:14+5:30
सणसवाडी (ता. शिरूर) येथे निवडणुकीत विजयी झाल्यानंतर फटाके वाजवल्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून

सणसवाडीत फटाके वाजवण्यावरून मारामारी
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथे निवडणुकीत विजयी झाल्यानंतर फटाके वाजवल्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांच्या ४५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ १२ जणांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून सणसवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भैरवनाथ पॅनल व जय मल्हार पॅनल यांचे एकमेकांविरोधात उमेदवार निवडणुकीस उभे होते. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास भैरवनाथ पॅनलचे विजयी उमेदवार बाबाजी दरेकर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार सागर दरेकर यांच्या घरासमोर फटाके वाजविल्याच्या कारणावरून विजयी व पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. यानंतर जमावामधील समर्थकांच्या हातातील काठ्या, लोखंडी गज, लोखंडी दांडक्यांच्या साह्याने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात इनोव्हासह अनेक चारचाकी वाहनांच्या काचाही जमावाने फोडल्या होत्या.
या जोरदार भांडणाची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांना समजताच व वादातील दोन्ही बाजूंचा जमाव लक्षात घेऊन शेजारील रांजणगाव पोलिसांनाही मदतीला बोलावून घेतले. दीड-दोन तास चाललेली मारामारी बाराच्या सुमारास नियंत्रणात आल्यानंतर दोन्ही बाजूंच्या ४५ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले असून त्यातील सूरज रमेश दरेकर, मिलिंद रघुनाथ दरेकर, भानुदास विनायक दरेकर, गणेश बबन दरेकर, बबन पन्नालाल दरेकर, विजय बबन दरेकर, शिवाजी पन्नालाल दरेकर, देवराम पठाणराव दरेकर, प्रल्हाद बबन दरेकर, अक्षय शिवाजी दरेकर, मंगेश पन्नालाल दरेकर, गणेश कैलास दरेकर आदी १२ जणांना अटक केली. शिरूर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. (वार्ताहर)