जागेच्या वाटपावरून घरातील सदस्यांत मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:10 IST2020-12-24T04:10:41+5:302020-12-24T04:10:41+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री रमेश घुले यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. नांदूर येथे ज्ञानेश्वर चिखले यांच्या घरासमोर ...

Fights between members of the household over the allocation of space | जागेच्या वाटपावरून घरातील सदस्यांत मारामारी

जागेच्या वाटपावरून घरातील सदस्यांत मारामारी

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री रमेश घुले यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे.

नांदूर येथे ज्ञानेश्वर चिखले यांच्या घरासमोर रामदास तुकाराम चिखले, शंकर तुकाराम चिखले व महादेव तुकाराम चिखले (सर्व रा.नांदूर) हे तिघेजण आले. घराचे काम करायचे नाही असे म्हणून त्यांनी राजश्री रमेश घुले,उषा मच्छिंद्र कोकणे यांना काठीने मारहाण करून दुखापत केली.तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत राजश्री घुले यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शंकर तुकाराम चिखले यांनी फिर्याद दिली आहे. जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून ज्ञानेश्वर तुकाराम चिखले, अनिल ज्ञानेश्वर चिखले, उषा मच्छिंद्र कोकणे, जयश्री रमेश घुले, हौसाबाई ज्ञानेश्वर चिखले, उमेश थिटे सर्व रा. नांदूर यांनी बेकायदा गर्दी जमवून शंकर चिखले यांना मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेले भाऊ रामदास चिखले आणि महादेव चिखले यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शंकर तुकाराम चिखले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी एस.एन नाडेकर व अजित मडके करत आहेत

Web Title: Fights between members of the household over the allocation of space