शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"हार न मानता लढले, अन् ७५ वर्षांच्या आईसह कोरोनावर मात करत घरी परतले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:26 IST

सर्वजण होते एकाच रुग्णालयात दाखल

ठळक मुद्देकुटुंबातील पाचही जण सकारात्मक विचारानेच कोरोनातून मुक्त

वाघोली: कोरोना विरूद्ध लढलेल्या एका कुटूंबातील पाच सदस्यांनी ज्येष्ठ आईसह कोरोनावर मात केली आहे. पुणे जिल्ह्यातील बकोरी गावात राहणाऱ्या निसर्गप्रेमी चंद्रकांत वारघडे यांच्या कुटूंबातील पाच जणांना कोरोनाने गाठले. यामध्ये हार न मानता ते लढले आणि ७५ वर्ष वयाच्या आई सह सर्वजण यशस्वी रित्या कोरोनावर मात करत घरी परतले.  

''त्रास सुरू झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच एका पाठोपाठ एक एक असे आम्ही एकाच रुग्णालयात दाखल झालो. यावेळी सर्वांनी घाबरून न जाता एकमेकांना आधार दिला, खूप सकारात्मक विचार ठेवले. त्यामुळे ७५ वर्ष वयाच्या आईसह आम्ही पाचही जण कोरोनामुक्त झालो'', असे वारघडे यांनी सांगितले.  

पुढे ते म्हणाले, माझी मुलगी धनश्री हिला प्रथम कोरोनाचा त्रास झाला. ताप अधिक असल्याने कोरोनाचा संशय आला. तिची चाचणी करून लगेच उपचार सुरू केले. मात्र दोन दिवसात त्रास कमी न झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मग घरातील सर्वांच्याच चाचण्या केल्या. त्यानंतर माझी आई, पत्नी, मुलगा या सर्वांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले. सगळ्यात शेवटी मी दाखल झालो. सर्वजण एकाच रुग्णालयात असल्याने एकमेकांना धीर देत होते. वय जास्त असल्यामुळे आईची जास्त काळजी होती. मात्र मी घरातील कर्ता पुरुष असल्याने काळजावर दगड ठेऊन सर्वांना धीर दिला. आम्ही पाचही जण खूप सकारात्मक विचार करत कोरोनातून मुक्त झालो. आता सर्वजण रुग्णालयातून सुखरूप घरी आलो आहोत.  

मुळात अशी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून न जाता खूप सकारात्मक रहा. अन्य कुटुंबीय व मित्रांनीही खूप आधार दिला. यामुळे कोरोनातून मुक्त झालो. सर्वाना कळकळीची विनंती आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीचा वापर करा.''अशा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याChandan Nagarचंदननगरhospitalहॉस्पिटल