डेक्कन चार्जर्स व एफसी अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:11 IST2021-03-20T04:11:20+5:302021-03-20T04:11:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत फर्ग्युसन कॉलेज ...

Fighting for the title between Deccan Chargers and FC A. | डेक्कन चार्जर्स व एफसी अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

डेक्कन चार्जर्स व एफसी अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत फर्ग्युसन कॉलेज अ व डेक्कन चार्जर्स या संघानी अनुक्रमे टेनिस टायगर्स व एमडब्लूटीए या संघांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी खेळल्या जाणाऱया या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात संजय रासकर, पुष्कर पेशवा, यश देशमुख, संग्राम चाफेकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर फर्ग्युसन कॉलेज अ संघाने टेनिस टायगर्स संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

दुसऱ्या सामन्यात डेक्कन चार्जर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत एमडब्लूटीए संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून जयदीप दाते, आशिष पुंगलिया, अजय कामत, मदन गोखले, मुकुंद जोशी, ऋषिकेश पाटसकर, आशिष पुंगलिया, चिराग शहा यांनी सुरेख कामगिरी केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्य फेरी :

एफसी अ वि.वि. टेनिस टायगर्स २०-१४

१०० अधिक गट : संजय रासकर-पुष्कर पेशवा वि.वि. शिवाजी यादव-संतोष जयभाई ६-१,

९० अधिक गट : पंकज यादव-मनोज कुलकर्णी पराभूत वि. केतन जाठार-राहुल पंढरपुरे ४-६,

खुला गट : यश देशमुख-संग्राम चाफेकर वि.वि. शिवाजी यादव-अभिजित मराठे ६-१,

खुला गट : जान्हवी अय्यर-पुष्कर पेशवा पराभूत वि. अनिकेत वाकणकर-गोपी जयभाई ४-६,

डेक्कन चार्जर्स वि.वि. एमडब्लूटीए २४-०७

१०० अधिक गट : जयदीप दाते-आशिष पुंगलिया वि.वि.सुमंत पॉल-प्रवीण पांचाळ ६-०,

९० अधिक गट : अजय कामत-मदन गोखले वि.वि. जयदीप वाकणकर-राजेश मंकणी ६-१,

खुला गट : मुकुंद जोशी-ऋषिकेश पाटसकर वि.वि. मंदार वाकणकर-अजित सैल ६-३,

खुला गट : आशिष पुंगलिया-चिराग शहा वि.वि. सुमंत पॉल-श्याम पेडणेकर ६-३,

Web Title: Fighting for the title between Deccan Chargers and FC A.