दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:13 IST2021-09-08T04:13:51+5:302021-09-08T04:13:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याकडे काही वर्षे काम करणाऱ्याने कामगारांना जेवायला बोलावल्याच्या रागातून एका भंगार विक्रेत्याने दुसऱ्या भंगार ...

Fighting between two scrap dealers | दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी

दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आपल्याकडे काही वर्षे काम करणाऱ्याने कामगारांना जेवायला बोलावल्याच्या रागातून एका भंगार विक्रेत्याने दुसऱ्या भंगार विक्रेत्याला लोखंडी रॉडने मारत जीव घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरुद्ध परस्पर विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

रमेश कुमार ऊर्फ राजन जीवनलाल अग्राहरी (वय ३२, रा. साईनाथनगर, जुना मुंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अहमद महंमद पुरीयल (रा. नागपूर चाळ, येरवडा), जाकीर मोतीलाल तांबोळी (रा. यमुनानगर, विमाननगर) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन तांबोळीला अटक केली. हा प्रकार वडगाव शेरी येथील सोपानगरमधील अग्राहरी स्कॅप सेंटरमध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता घडला.

रमेशकुमार हे पुरियल यांच्या भंगाराच्या दुकानात १० वर्षे काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चे भंगाराचे दुकान सुरू केले. रमेशकुमार यांचा भाऊ अखिलेश याला मुलगी झाल्याने त्याने कामगारांसाठी जेवणाची पार्टी ठेवली होती. त्याला पुरियल याच्या दुकानातील ८ ते १० कामगारांना जेवायला बोलावले. त्याचा राग येऊन पुरियल व तांबोळी यांनी रमेशकुमारला शिवीगाळ करुन मारहाण केली.

Web Title: Fighting between two scrap dealers