फुरसुंगीत क्रिकेटच्या वादातून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST2021-05-05T04:19:23+5:302021-05-05T04:19:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : क्रिकेट खेळण्यासाठी टीममध्ये न घेतल्याचा राग आल्याने दोन गटांत फुरसुंगी येथील चंदवाडी मैदानावर हाणामारी ...

Fighting between two groups over a cricket dispute | फुरसुंगीत क्रिकेटच्या वादातून दोन गटांत हाणामारी

फुरसुंगीत क्रिकेटच्या वादातून दोन गटांत हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : क्रिकेट खेळण्यासाठी टीममध्ये न घेतल्याचा राग आल्याने दोन गटांत फुरसुंगी येथील चंदवाडी मैदानावर हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पराविरोधात तक्रारी दिल्या असून, हडपसर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

फुरसुंगीतील शंकर हरपले मैदानावर बाळू राखपसरे (वय २७) हे भावंडांसोबत क्रिकेट खेळत होते. त्या वेळी तेथे आलेल्या टोळक्याला राखपसरे यांनी खेळण्यास घेतले नाही. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने त्यांना बॅटने मारहाण करुन जखमी केले. पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुरेश चंद (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा अक्षय आणि इतर सहकारी यांची राखपसरे यांच्यासोबत वादावादी झाली होती. त्याचा राग आल्याने टोळक्याने सुरेश चंद आणि समीर गायकवाड यांच्या घराच्या काचा फोडून नुकसान केले.

Web Title: Fighting between two groups over a cricket dispute