दोन गट, नऊ गणात थेट लढत

By Admin | Updated: February 15, 2017 01:57 IST2017-02-15T01:57:48+5:302017-02-15T01:57:48+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारी झाल्यानंतर, ७५ गट व १५0 गणांसाठी एकूण ९७३ उमेदवार रिंगणात

Fighting between two groups, nine groups directly | दोन गट, नऊ गणात थेट लढत

दोन गट, नऊ गणात थेट लढत

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारी झाल्यानंतर, ७५ गट व १५0 गणांसाठी एकूण ९७३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ४४ जागेवर तिरंगी लढती होत असल्या, तरी ११ जागेवर थेट लढत होणार आहे. यात गटासाठी दोन व गणासाठी ९ जागांचा समावेश आहे.
२१ फेबु्रवारी रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ गट व १५0 गणांसाठी निवडणूक होत आहे. ६ फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गटांसाठी ५२९, तर गणांसाठी ९०५ असे १४३४ उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते. यात पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेल्याची संख्या अधिक होती.
अर्ज छाननीत काही जणांचे अर्ज बाद झाले होते. असे असले तरी मोठ्या प्रमाणात अर्ज शिल्लक होते. सोमवारी माघारीच्या दिवशी १४३५ अर्जांपैैकी ४६१ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे गण व गटाच्या २२५ जागांसाठी आता ९७३
उमेदवार रिंगणात आहेत. यात
पंचायत समितीच्या १५0 गणांसाठी ६१४, तर ७५ गटांसाठी ३५९ उमेदवार आहेत.
ही निवडणूक सर्वच पक्ष स्वबळावर लढवित असल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांच्यासह काही ठिकाणी मनसे, रासप व काही ठिकाणी स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिले आहेत. त्यामुळे बहुरंगी लढती या अपेक्षितच आहेत. जिल्हा परिषदेचा पळसदेव-बिजवडी हा एकमेव गट असा आहे की, तिथे सर्वाधिक १0 उमेदवार रिंगणात आहेत.
७५ गटांपैैकी शिरूरमधील शिक्रापूर-सणसवाडी व खेडमधील रेटवडी पिंपळगावतर्फे खेड या दोन गटांत थेट लढत होत आहे. यात शिक्रापूर-सणसवाडी गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होत आहे. राष्ट्रवादीतर्फे कुसूम मांढरे व भाजपातर्फे कुसुम खैैरे रिंगणात आहेत. तसा हा गट राष्ट्रवादीचा बालकिल्ला. कै. बाळासाहेब खैरे हे येथील राष्ट्रवादीचे नेते. ते शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहिले, मात्र शेवटी शेवटी ते नाराज होते. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कुसुम खैरे या राष्ट्रवादीकडून इच्छुक होत्या. मात्र, त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे संधी साधत भाजपाने त्यांना तिकीट दिले. इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार येथे नसल्याने ही थेट लढत होत आहे.
त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या रेटवडी तर्फे पिंपळगाव खेड या गटात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीतर्फे निर्मला पानसरे, तर शिवसेनेतर्फे सुवर्णा जवळेकर एकमेकींविरोधात लढत आहेत. यापूर्वी या गटात काँग्रेसचे दादाभाऊ पारधी निवडून आले होते. मात्र, त्यानंतर ते शिवसेनेत गेले. काँग्रेसचा गट असूनही येथे त्यांना उमेदवार देता आला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Fighting between two groups, nine groups directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.