अस्वच्छतेशी लढा, मग खेळा!
By Admin | Updated: December 19, 2014 01:52 IST2014-12-19T01:52:43+5:302014-12-19T01:52:43+5:30
संयोजनासाठी करण्यात येणाऱ्या बेलगाम अंदाजित खर्चामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या महापौर चषक स्पर्धेतील कबड्डी स्पर्धाही खेळाडूंसाठीच्या ढिसाळ नियोजनामुळे चर्चेचा विषय ठरणार आहे.
_ns.jpg)
अस्वच्छतेशी लढा, मग खेळा!
सुनील राऊत, पुणे
संयोजनासाठी करण्यात येणाऱ्या बेलगाम अंदाजित खर्चामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या महापौर चषक स्पर्धेतील कबड्डी स्पर्धाही खेळाडूंसाठीच्या ढिसाळ नियोजनामुळे चर्चेचा विषय ठरणार आहे. ही स्पर्धा येत्या शनिवारी (दि. २०) रोजी सुरू होणार असली तरी, या स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंना पालिकेच्या अर्धवट काम झालेल्या आणि कमालीचे अस्वच्छ असलेल्या सणस मैदानतील क्रीडा हॉस्टेलमध्ये आपला मुक्काम करावा लागणार आहे. स्पर्धा शनिवारी सुरू होणार असल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळपासूनच राज्यभरातील स्पर्धक या हॉस्टेलमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हॉस्टेलच्या जागी जाऊन पाहणी केली असता, अर्धवट बांधकाम झालेल्या खोल्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अर्धवट विद्युत व्यवस्था, तर काही ठिकाणी चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
पालिकेकडून महापौर चषकाअंतर्गत ६१ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा शनिवारी धनकवडी येथील तीन हत्ती चौकाच्या परिसरात होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील पुरुष आणि महिला संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ६०० ते ७०० खेळाडू येणे अपेक्षित आहे. या खेळाडूंची निवासव्यवस्था सणस मैदानातील महापालिकेने उभारलेल्या क्रीडा हॉस्टेलमध्ये केली आहे. मात्र, ८० खोल्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहातील सुमारे २० ते २५ खोल्यांचेच काम
पूर्ण झालेले आहे. त्यामुळे ही
जागा या खेळाडूंना अपुरी पडणार आहे. मात्र, या हॉस्टेलचे काम अर्धवट असून, संपूर्ण हॉस्टेलच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.