निमसाखर चौपन्न फाटा रस्ता दुरूस्तीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:00+5:302020-12-09T04:09:00+5:30
निमसाखर चौपन्न फाटा रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. नागरीकांनी या बाबत वारंवार तक्रारी ...

निमसाखर चौपन्न फाटा रस्ता दुरूस्तीला सुरूवात
निमसाखर चौपन्न फाटा रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. नागरीकांनी या बाबत वारंवार तक्रारी करूनही कुठलीच दखल घेतली जात नव्हती. निमसाखर येथील गोविंद रणवरे, अनिल बोंद्रे व भागवत गोरे यांनी या रस्त्याचे काम तत्काळ सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच या रस्त्याच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. अखेर प्रशासनाला या दोन्ही बाबींची दखल घ्यावी लागली. रस्ता दुरूस्तीला सध्या सुरूवात करण्यात आली आहे. सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. लकरच संपुर्ण रस्ता दुरुस्त केला जाणार आहे.
फोटो ओळी निमसाखर चौपन्न फाटा रस्त्याच्या कामाला करण्यात आली सुरुवात.
सत्यजीत रणवरे