थंडीतील गेल्या दशकातील पाचवी गरम रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:41+5:302021-01-08T04:28:41+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्यावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात ऐन थंडीत ...

थंडीतील गेल्या दशकातील पाचवी गरम रात्र
पुणे : महाराष्ट्र राज्यावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात ऐन थंडीत उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. गेल्या १० वर्षांतील डिसेंबर महिन्यातील सर्वांत गरम असलेली पाचवी रात्र मंगळवार ठरली आहे. मंगळवारी सकाळी पुण्यातील किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
द्रोणीय स्थितीमुळे हे कमीदाबाचे क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. त्यामुळे सध्या ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण व मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन-चार दिवस राज्यात रात्रीचा थंडीचा कडाका कमी राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ७ तारखेला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा व शहरात पुढील ४ दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
५, ६ व ७ जानेवारी रोजी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ८ जानेवारीला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
---
पुण्यातील सर्वांत जास्त किमान तापमान असलेली रात्र (अंश सेल्सिअस)
२ डिसेंबर २०१३ - २१.५
२६ डिसेंबर २०१९ - २१.४
६ डिसेंबर २०१७ - २१.१
५ डिसेंबर २०१९ - २०.८
५ डिसेंबर २०२१ - १९.७