ईद निमित्त पंधराशे कुटुंबियांना शिरखुर्मा साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:37+5:302021-05-14T04:11:37+5:30
बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा ...

ईद निमित्त पंधराशे कुटुंबियांना शिरखुर्मा साहित्य
बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा याची चिंता अनेक मुस्लिम कुटुंबियांना जाणवत होती. या पार्श्वभुमीवर बारामतीच्या सातव कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत शिरखुर्मा साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला.
मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी गटनेते सचिन सातव व नगरसेवक सूरज सातव, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांच्या वतीने ईद निमित्त गुरुवारी (दि १३) १५०० कुटुंबियांना शिर्रखुमा साहित्य किट व दूध वाटप केले. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच दुकाने, उद्योगधंदे, बंद आहेत. मजूर, कामगार, मध्यमवर्गीय नौकरदार तसेच ७० टक्के मुस्लिम समाज हा व्यवसायात असल्याने लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यात फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. सण वार कोरोनाच्या छायेत असल्याने ही बाब पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी पंधराशे कुंटुबांना शिर्रखुमा साहित्य किट व दूध वाटप केले. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी साखर दौंड शुगर मार्फत व बारामती दूध संघ मार्फत दुधाची सोय करण्यासाठी सूचना केल्या.
या प्रसंगी पत्रकार मन्सूर शेख, फिरोज सय्यद, आक्रम बागवान, फिरोज शेख, अभिजित ढवान पाटील, अनिस मोमिन, समीर शेख उपस्थित होते. तर नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव, नगरसेवक संतोष जगताप, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मुस्लिम बांधवांना बरोबर घेऊन घरोघरी जाऊन साहित्य वाटपाचे नियोजन केले.
———————————
...संकटात अमूल्य मदत
कोरोना महामारीच्या काळात सातव परिवाराने मागील वर्षी आणि चालू रमजान महिन्यात आपुलकीने केलेली मदत अमूल्य अशीच आहे.
—बारामती आम मुस्लीम यूथ फाउंडेशन
————————————
फोटोओळी—बारामती शहरात ईद निमित्त सातव परिवाराच्या वतीने पंधराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य किट व दूध वाटप करण्यात आले.
१३०५२०२१ बारामती—०४
———————————————
बातमी फोटोसह सविस्तर आवश्यक
—————————