सख्ख्या भावानेच केला गोळीबार

By Admin | Updated: December 22, 2016 02:12 IST2016-12-22T02:12:40+5:302016-12-22T02:12:40+5:30

कोयनानगर येथे सात महिन्यांपूर्वी महेश भोसले यांच्यावर गोळीबार करून पसार झालेला आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून,

Fierce firing by a simple brother | सख्ख्या भावानेच केला गोळीबार

सख्ख्या भावानेच केला गोळीबार

पिंपरी : कोयनानगर येथे सात महिन्यांपूर्वी महेश भोसले यांच्यावर गोळीबार करून पसार झालेला आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून, फिर्यादीचा सख्खा भाऊ असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. विष्णू भोसले आणि जमीर दिलावर शेख (रा. सिंकजरपूर, जिल्हा लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
२८ मे २०१६ ला रात्री महेश भोसले हे दुचाकीवरून चिखली, कोयनानगर येथून घरी जात होते. त्या वेळी तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. फिर्यादी महेश यांच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये प्रमुख आरोपी त्यांचा सख्खा भाऊ विष्णू भोसले असल्याचे उघडकीस आले आहे. त्याला जमीर शेख या आरोपीने मदत केली. नेम चुकल्याने महेश भोसले बचावले. निगडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिर्यादी महेश भोसले यांच्याकडे संशयितांबाबत माहिती विचारली. त्या वेळी विष्णू भोसले याचे नाव पुढे आले होते. महेश यांचा भाऊ विष्णू याची माहिती काढली असता, तो लातूर येथील कारागृहात असल्याचे समजले. त्याला तेथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गोळीबाराविषयी विचारणा केली असता, तो उडवाउवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच जमिनीच्या वादातून साथीदाराच्या मदतीने भावावर गोळीबार केल्याची कबुली त्याने दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Fierce firing by a simple brother