सासवडमध्ये उद्या रंगणार नवरात्रोत्सवाची पर्वणी
By Admin | Updated: September 26, 2016 01:31 IST2016-09-26T01:31:33+5:302016-09-26T01:31:33+5:30
गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर घरोघरी चाहूल लागते ती नवरात्रोत्सवाची. नवरात्राचे चैतन्य सर्वत्र पसरलेले दिसते. विशेषत:

सासवडमध्ये उद्या रंगणार नवरात्रोत्सवाची पर्वणी
पुणे : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर घरोघरी चाहूल लागते ती नवरात्रोत्सवाची. नवरात्राचे चैतन्य सर्वत्र पसरलेले दिसते. विशेषत: महिलांची नऊ दिवसांच्या पूजेची, दर दिवशीच्या रंगांची लगबग आणि उत्साह पाहायला मिळतो.
गरबा, दांडिया आणि त्यातील उडत्या चालीच्या गाण्यांची चलती, हे तर नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी सखी मंचच्या सभासदांसाठी खास ‘नवरात्री स्पेशल’ बहारदार हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. सासवड, जेजुरी, दौंड, उरुळीकांचन, बारामती या सर्व ठिकाणी महिलांसाठी हा कार्यक्रम होणार आहे.
गायक अमेय जोग, गायिका राखी जैन, अश्विनी कप्रे हे कलाकार गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासोबतच सखी मंच सभासदांसाठी पाककृती स्पर्धा घेण्यात येणार आहे. गाण्यांच्या कार्यक्रमांबरोबरच महिलांना पाककृती स्पर्धेत सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी सभासदांनी घरूनच कोणताही गोड पदार्थ तयार करून कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन यायचे आहे. सजावटीसाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. ही स्पर्धा पाककृती सजावट, आकर्षक पाककृती यांचे योग्य परीक्षण करून विजेत्यांना कार्यक्रमस्थळी बक्षीस देण्यात येईल.
(वार्ताहर)