भीमाशंकरला फुलपाखरांचा उत्सव
By Admin | Updated: October 7, 2016 03:45 IST2016-10-07T03:45:39+5:302016-10-07T03:45:39+5:30
पावसामुळे डोंगरदऱ्यांवर हिरवई नटली आहे. पाने, फुले, पक्षी, नाले, पठार, झुऱ्या ... सगळा निसर्ग फुलला आहे. रानात फिरताना फुलांवर बागडणारी, सगळीकडे भिरभिरनारी

भीमाशंकरला फुलपाखरांचा उत्सव
घोडेगाव : पावसामुळे डोंगरदऱ्यांवर हिरवई नटली आहे. पाने, फुले, पक्षी, नाले, पठार, झुऱ्या ... सगळा निसर्ग फुलला आहे. रानात फिरताना फुलांवर बागडणारी, सगळीकडे भिरभिरनारी नाजूक, छोटीशी, चमदार, रंगीबेरंगी, मन मोहून टाकणारी फुलपाखरे सध्या रानावनात दिसत आहेत. भीमाशंकर सारख्या अभयारण्यात अनेक विविध रंगी फुलपाखरांचा उत्सव जणू भरला आहे.
पावसाच्या धारा या वर्षी भरपूर पडल्या. या पावसाने सगळा निसर्ग फुलून गेला. वेगवेगळी फुले, वेली, गवते, झाडे चमकू लागली आहेत. हा निसर्ग पाहताना यातील फुलपाखरे सगळ्यांच्या नजरा आकर्षित करून घेतात. जैव विविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात सुमारे अडीचशे फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. पुणे जिल्ह्यातही भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये अशीच विविध प्रजातींची फुलपाखरे सध्या दिसत आहेत. त्यांच्याकडे नकळतच पर्यटक, अभ्यासक आकर्षित होताना दिसत आहेत. भीमाशंकरच्या जंगलात मोठ्या संख्येने ब्यू मॉरमॉन आढळतात. येथील आदिवासी लोक ब्यू मॉरमॉन फुलपाखराला ‘राणी पाकोळी’ म्हणतात. फुलपाखरू परिसंस्थेला संरक्षण मिळावे व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ब्ल्यू मॉरमॉनला मानचिन्ह केले आहे. फुलपाखरेही निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरे व त्यांची सरवंटे खातात. सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरदऱ्या फुलपाखरांचा हक्काचा अधिवास आहे. येथे ब्यू मॉरमॉन, निलपरी, सरदार, पतंग, लेमन पेन्सी, पियरो अशी विविध प्रजातींची फुलपाखरे आढळतात. याती ब्यू मॉरमॉन फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून मान मिळालेला आहे.
राज्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बोरावली येथे फुलपाखरू उद्यान बनवण्यात आले आहे. त्याच धरतीवर राज्यातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये फुलपाखरू उद्याने उभारली जाणार आहे. भीमाशंकर अभयारण्यात बनविण्यात येत असलेल्या बेलवनात असे फुलपाखरू उद्यान केले जाणार आहे. यासाठी स्थानिक फुलांची झाले, झाडोरा यांचा अभ्यास करून येथे असलेल्या स्थानिक फूलपाखरांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
-सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग
फुलपाखरांचे उद्यान हवे
हा उद्देश सफल करण्यासाठी फुलपाखरू उद्यान उभारले गेले पाहिजे, तसेच फुलपाखरांबाबत जनजागृती व शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या निसर्गात सहली आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने फुलपाखरे आपल्याकडे आकर्षित करून सर्वांना मनस्वी आनंद देत असतात. यासाठी यांचे संवर्धन झाले पाहिजे, अशी वन्यजीव अभ्यासकांची अपेक्षा आहे.