सीसी टीव्हीमुळे सापडली महिला चोर
By Admin | Updated: September 6, 2014 00:18 IST2014-09-06T00:18:33+5:302014-09-06T00:18:33+5:30
दगडूशेठ गणपती मंडपात रांगेतील गर्दीचा फायदा घेऊन रांगेतील पुढच्या महिलेची पर्स चोरली.. दानपेटीत दान टाकताना चोरी झाल्याचे लक्षात आले..

सीसी टीव्हीमुळे सापडली महिला चोर
पुणो : दगडूशेठ गणपती मंडपात रांगेतील गर्दीचा फायदा घेऊन रांगेतील पुढच्या महिलेची पर्स चोरली.. दानपेटीत दान टाकताना चोरी झाल्याचे लक्षात आले.. या बाईने महिला पोलिसांना घटना सांगितली. तत्काळ दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टच्या सीसी टीव्हीची पाहणी केली.. चोरी करताना एक बाई दिसली.. परिसरात तिचा तत्क्षणी तपास सुरू केला अन् बेलबाग चौकात पोलिसांची नजर चुकवून लगबगीने चालणा:या चोर बाईचा पत्ता लागला. विश्रमबाग पोलिसांनी तिला अटक केली असून, न्यायालयनो 9 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मीराबाई ओंकार कसबे (वय 45, रा. मु. पो. शिरूर, ता. धुळे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुड्डी चौहाण (वय 4क्, रा. घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंडपामध्ये 4 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
चौहाण या त्यांच्या मैत्रिणीसह दर्शनाला गेल्या होत्या, त्या वेळी मागे उभी असलेली महिला त्यांना सतत धक्का देत होती. पुढे जाऊन त्यांनी दानपेटीत दान देण्यासाठी पर्स पाहिली, तर त्याची चैन उघडी होती.
आतील छोटय़ा पर्सची चोरी झाल्याचे कळाल्याने त्यांनी बंदोबस्ताला उभ्या असणा:या पोलिसांना ही हकीकत सांगितली. त्यांनी दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टच्या सीसी टीव्हीत पाहिले, तर धक्का देणा:या महिलेनेच चोरी केल्याचे दिसून आले. या महिलेचा पोलिसांनी शोध सुरू केल्यावर बेलबाग चौकात ती पोलिसांना पाहून गडबडीत निघून जाताना दिसली, त्या वेळी पोलिसांनी तिला अटक केले. (प्रतिनिधी)
नऊ सप्टेंबर्पयत पोलीस कोठडी
4कसबे हिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का? तिच्याकडून लंपास केलेली रक्कम हस्तगत करायची आहे, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केली होती. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरला.