शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिला वाहकांना मिळणार नऊ महिन्यांची प्रसूती रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 12:57 IST

महिला वाहक कर्मचाºयांना दोन हयात अपत्यांपर्यंत १८० दिवसांच्या प्रसूती रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा घेता येणार आहे. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला वाहकांनाही याचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाचा निर्णय : बैठे काम करण्याचीही मुभा

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) तील महिला वाहक कर्मचाऱ्यांना आता नऊ महिन्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. तसेच सरासरी वेतनावरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करताही घेता येणार आहे. वाहक वगळता इतर महिला कर्मचाऱ्यांना मात्र पूर्वीप्रमाणेच सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळेल. एसटी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी दि. १२ जानेवारीपासून होणार आहे. याबाबत प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना २४ नोव्हेंबर २०१० च्या परिपत्रकानुसार १८० दिवस खास प्रसूती रजा मंजूर केली जाते. या परिपरत्रकातील तरतुदींमध्ये आता सुधारणा करण्यात आली असून केवळ महिला वाहक कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रसूती रजेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याबाबतचा ठराव १२ जानेवारी रोजीच झाला होता. त्याबाबतचे परिपत्रक २३ मार्च रोजी काढण्यात आले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ठरावाच्या दिवसापासूनच होणार आहे. सुधारित परिपत्रकानुसार, महिला वाहक कर्मचाऱ्यांना दोन हयात अपत्यांपर्यंत १८० दिवसांच्या प्रसूती रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा घेता येणार आहे. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला वाहकांनाही याचा लाभ होणार आहे. प्रसूती रजा संपल्यानंतर आवश्यकता असल्यास महिला वाहकांच्या खाती जमा असणारी सरासरी वेतनावरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता घेता येईल.  कालावधी ठरविण्याचा अधिकारया रजेपैकी किती व कोणत्या कालावधीत रजा घ्यावी, हे ठरविण्याचा अधिकारही महिला वाहकांना असेल. गरोदरपणाच्या पहिल्या चार महिन्यांपर्यंत शैक्षणिक पात्रतेनुसार बैठे काम देण्याचा निर्णय विभागीय पातळीवर घेतला जाईल. तसेच या काळात काही ठराविक महिन्यांपर्यंत सुरक्षित, सुस्थितीत असलेल्या मार्गावर काम देण्याचा निर्णय आगार व्यवस्थापक घेतील, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळ