नियम मोडणाऱ्यांचा गुलाब देऊन सत्कार
By Admin | Updated: January 14, 2017 02:42 IST2017-01-14T02:42:36+5:302017-01-14T02:42:36+5:30
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांचा शुक्रवारी लोणावळा शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार

नियम मोडणाऱ्यांचा गुलाब देऊन सत्कार
लोणावळा : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांचा शुक्रवारी लोणावळा शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
रिफ्लेक्टर व सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष करत वाहन चालविणाऱ्या वाहनांवर वाहतूक नियमांचे स्टिकर व रेडिअम लावण्यात आले. शहरात वाहतूक पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, वाहतूक विभागाचे हवालदार सुरेश माने, कॉन्स्टेबल अनंत रावण, सुनील मुळे, सामिल प्रकाश, सतीश ओव्हाळ, दर्शन गुरव, अंकुश गायखे, प्रकाश मराठे उपस्थित होते.
जाधव म्हणाले, ‘‘प्रत्येक जण हा आपल्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचा असतो. याकरिता वाहने चालविताना स्वत:च्या व इतरांच्या जिवाची काळजी घ्या, असा सल्ला दिला. दुचाकीस्वारांनी गाडी चालविताना हेल्मेट घालावे. ’’ (वार्ताहर)