गरजू, गरीब मुलांना खाऊ, शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:32+5:302021-03-27T04:10:32+5:30
कात्रज येथील सोसायट्यांमध्ये सामाजिक ऐक्य निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. कात्रज परिसरातील वृद्धाश्रम आणि वंचित घटकांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम ...

गरजू, गरीब मुलांना खाऊ, शालेय साहित्य वाटप
कात्रज येथील सोसायट्यांमध्ये सामाजिक ऐक्य निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. कात्रज परिसरातील वृद्धाश्रम आणि वंचित घटकांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून दक्षिण उपनगरांमधील ममता फाउंडेशन, सुमती बाल भवन, जनसेवा फाउंडेशन, माय माउली केअर सेंटर, अक्षर स्पर्श शाळा अशा अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ मिळवून दिले. जगताप यांनी षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा वंचित व निराधारा मुलांना सोबत साजरा केला. यावेळी ॲड.जगताप यांनी ममता फाउंडेशन, जनसेवा फाउंडेशन व माय माउली केअर सेंटर या संस्थांना आर्थिक मदतीबरोबरच धान्य, खाऊ, शालेय साहित्यांचे वाटप व ममता फाउंडेशनमधील एचआयव्हीग्रस्त मुलांना गोड जेवण दिले.
फोटो ओळ - षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सुग्रास जेवणाचा आनंद घेताना ममता फाउंडेशनमधील एचआयव्हीग्रस्त मुले.