पतीच्या छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:11 IST2021-05-09T04:11:53+5:302021-05-09T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने ...

पतीच्या छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
स्नेहल सागर मांडेकर (वय २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कोथरूड पोलिसांनी तिचा पती सागर बाळू मांडेकर (वय २९, रा. सुतारदरा, कोथरूड) याला अटक केली आहे.
याप्रकरणी स्नेहल हिच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना सुतारदरा येथील शिवसाईनगरमध्ये गुरुवारी रात्री घडली.
स्नेहलचा पती सागर हा तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. या छळाला कंटाळून गुरुवारी रात्री तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. सी. कोळी अधिक तपास करीत आहेत.