शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री पर्वतरांगात दरड कोसळण्याची भीती;उपाययोजनांची मागणी

By राजू इनामदार | Updated: June 17, 2025 19:41 IST

- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा पुढाकार

पुणे: सततच्या पावसाने सह्याद्री पर्वतरागांमध्ये येत्या काही दिवसात दरडी कोसळण्याचा अंदाज पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडून यावरच्या उपाययोजना माहिती करून घ्याव्यात व अमलात आणाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करण्याची गरजही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुनील माने यांनी ही माहिती दिली. माने म्हणाले, “सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते येत्या काही काळात तिथे दरडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. याची आधी माहिती मिळाल्याने त्यावर उपाययोजना करणे सरकारचे काम आहे. त्यासाठी डॉ. गाडगीळ यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटावे व याची माहिती घ्यावी.”

मागील काही वर्षात मानव व वन्य प्राणी यांच्यात सातत्याने संघर्ष होताना दिसतो. वेगाने होणारे शहरीकरण, जंगलांचा होणारा ऱ्हास, शेती पद्धतीत होणारे बदल, वन्यजीवांच्या संख्येतील प्रादेशिक चढउतार ही याची कारणे आहेत. अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मुळे आपण जंगली प्राण्यांना इजा पोहचवू शकत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारला त्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. राज्य सरकारने यात पुढाकार घ्यावा अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे माने यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस