शेलपिंपळगाव परिसरात बिबट्याच्या वास्तव्याने भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:31 IST2020-12-04T04:31:05+5:302020-12-04T04:31:05+5:30
मागील वर्षभरापासून तालुक्याच्या पूर्व भागातील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. शेलपिंपळगाव, साबळेवाडी, कोयाळी भानोबाची, ...

शेलपिंपळगाव परिसरात बिबट्याच्या वास्तव्याने भीतीचे वातावरण
मागील वर्षभरापासून तालुक्याच्या पूर्व भागातील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. शेलपिंपळगाव, साबळेवाडी, कोयाळी भानोबाची, मरकळ, मोहितेवाडी, बंगलावस्ती, संगमवाडी, रामनगर आदी ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे. मंगळवारी (दि.१) शेलपिंपळगाव परिसरात बिबट्या शिकारीच्या शोधात नागरीवस्तीत वावरत असल्याचे आढळून आले असून पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवला आहे. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच घटनास्थळी पाहणी करताना लगतच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. सध्या पावसाळी हंगाम सुरू असल्याने शेताकामे जोरात सुरू आहेत. मात्र बिबट्याच्या भीतीने महिला मजूर शेतात काम करण्यास नकार देत आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
फोटो
०३ शेलपिंपळगाव बिबट्या
शेलपिंपळगाव (ता.खेड) परिसरात आढळून आलेले बिबट्याचे ठसे.