शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सत्ताधारी व केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती: गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 16:50 IST

देशात अशांतता निर्माण करण्याचे काम सुरु आहे.

पुणे : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. मात्र, मागील दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये निश्चितपणे डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून केंद्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसेच देशात अशांतता निर्माण करण्याचे काम राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षांकडून सुरु आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यायला हवे असा हल्लाबोल पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे. 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप खासदार गिरीश बापट हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनासह विविध मुद्दयांवर भाष्य केले. बापट म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या कायदा कुठल्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नसून त्यात काही सुधारणा केल्या जातील. तसंच कायदा मागे घेतला जाणार नाही यावर सरकार ठाम आहे. 

... त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेलमुंबईत होत असलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले आहेत. मात्र त्यांनी पूर्वी देखील अशाच कायद्याचे विचार अनेकवेळा मांडलेले आहेत. आता मात्र तेच त्यांच्या मूळ विचाराला विरोध दर्शवित आहेत. जे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. तेच आम्ही मांडत आहोत. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल,” अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.

राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर नाही; पण...  

राज्यातील ठाकरे सरकार मला काही अस्थिर वाटत नाही. मात्र ज्यावेळी ते पडेल त्यांला कारणीभूत तेच असतील. आणि जरी ते पडले नाही तरी आम्हाला काही त्याच्याशी देणे घेणे नाही. या घडीला आम्ही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असून यापुढेही ते करत राहणार आहोत, असे भाष्य पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप