शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अटकेच्या भीतीने बीएचआरच्या गुंतवणूकदारांचे परत केले १०० टक्के पैसे; गुंतवणूकदारांनी मानले पोलिसांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 22:04 IST

निमगाव केतकीच्या ठेवीदारांना मिळाले १ कोटी ७५ लाख

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीआरएच) पतसंस्थेच्या ठेवीदारांचे केवळ ४० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १००टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेणार्या कंपनीने अटकेच्या भितीने इंदापूर तालुक्यातील ६४ ठेवीदारांचे उरलेले ६० टक्के त्यांच्या बांधावर जाऊन परत केले. या ठेवीदारांचे सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये परत केले असून ठेवीदारांना शोधून आता ते पैसे परत करत आहेत. पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणुकदारांची फसवणूक करणार्यांना एकामागोमाग अटक करण्यास सुरुवात केल्याने हे घडून आले आहे. पुणे पाेलिसांमुळेच आम्हाला पैसे परत मिळाले अशी भावना या ठेवीदारांनी व्यक्त केली आहे.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे बीआरएच पतसंस्थेची शाखा २०१३ मध्ये सुरु झाली होती. या पतसंस्थेत तेथील डाळींब उत्पादक शेतकर्यांनी प्रामुख्याने या पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. २०१४ मध्ये ही पतसंस्था बंद पडली. त्यानंतर पैसे मिळविण्यासाठी या शेतकर्यांनी जळगावला जाऊन बीआरएच च्या कार्यालयाच्या पायर्या झिझविल्या. परंतु, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने त्यांना कार्यालयातही येऊ दिले नाही.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या महिन्यात निमगाव केतकी येथील ठेवीदारांच्या घरी जाऊन त्यांच्या ठेवींविषयीची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक भोसले व त्यांच्या पथकाने बीआरएचमध्ये गुंतवणूक केलेल्यांची यादी तयार करुन त्यांचे जबाब नोंदविले. त्याचबरोबर या ठेवीचे ४० टक्के पैसे देऊन १००टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेणार्या ओम शिवम बिल्ट कॉन या कंपनीच्या लोकांचेही जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांनी दुसर्यांदा कारवाई करुन आणखी काही जणांना अटक केली. तसेच इंदूरहून जितेंद्र कंडारे यालाही अटक केली. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारे ठेवी घेतल्या होत्या. त्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे या कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन लोकांना त्यांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस