विना परवाना सरबत विक्री करणाऱ्यांवर एफडीएची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:40 PM2018-04-26T13:40:21+5:302018-04-26T13:40:21+5:30

उन्हाळ्यामुळे नागरिकांची विविध रसवंती गृहांमध्ये गर्दी हाेते. अनेकदा रसवंती चालकांकडून स्वच्छतेची पुरेशी काळजी घेण्यात येत नाही. अश्या दुकानदारांवर एफडीएकडून विशेष माेहिम राबवून कारवाई करण्यात येत अाहे.

FDA looks at non-licensed juice sellers | विना परवाना सरबत विक्री करणाऱ्यांवर एफडीएची नजर

विना परवाना सरबत विक्री करणाऱ्यांवर एफडीएची नजर

googlenewsNext
ठळक मुद्देविनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर एफडीएची नजरपाच ठिकाणांवर करण्यात आली कारवाई

पुणे : अन्न व अाैषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) परवाना नाेंदणी शिवाय कुठल्याही प्रकारच्या शीतपेयाची विक्री करता येत नाही. परंतु शहरातील अनेक रस्त्यांवर टेबल टाकून विविध सरबतांची विक्री करण्यात येते. अशा सरबत केंद्रांवर एफडीएची नजर असून 6 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत 206 ठिकाणांच्या तपासण्या एफडीए कडून करण्यात अाल्या अाहेत. तसेच पाच ठिकाणांवर कारवाई करुन 21 हजार रुपये दंड वसून करण्यात आला आहे. 
    उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांकडून थंड पेयांना पसंती देण्यात येते. रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यानंतर अापाेअापच नागरिकांची पाऊले रसवंती गृह, आयस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटरसकडे वळतात. प्रत्येक रसवंती गृह, शेतपेप विक्रेत्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे, तसेच स्वच्छ पाणी वापरने अावश्यक अाहे. परंतु अनेक विक्रेत्यांकडून स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. एफडीए कडून एक विशेष माेहिम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत शहरातील शीतपेयांचे स्टाॅल्स, दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. जेथे स्वच्छता पाळण्यात येत नाही, त्यांच्यावर एफडीएकडून दंडही अाकारण्यात येत आहे. या माेहिमेंतर्गत अात्तापर्यंत 206 तपासण्या करण्यात आल्या असून त्यातील पाच विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली अाहे. तसेच 47 ठिकाणचे नमुने गाेळा करण्यात आले अाहेत. त्यात एक रसवंती गृह, अाठ ज्यूस सेंटर, एकाेणतीस आयस्क्रीम, गाेळावाले, चार बर्फाचे कारखाने, व पाच आंबा विक्रेते यांच्याकडील नमुने तापसणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले अाहेत. त्याचबराेबर एफडीए कडून आत्तापर्यंत 9 जणांना परवाने अाणि 34 नाेंदणी दाखले देण्यात आले अाहेत. 
    महाराष्ट्र अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 नियम व नियमने 2011 अंमलात अालेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक अाहे. विना परवाना अन्न व्यवसायक केल्यास संबंधितांवर फाैजदारी खटला दाखल केला जाताे. तसेच त्यांना 6 महिने कारावास व 5 लाखांपर्यंत दंड हाेऊ शकताे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घेणे अावश्यक अाहे. तसेच नागरिकांनी स्वच्छता पाहूनच रसांचे सेवण करावे. उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे असे अावाहन एफडीएकडून करण्यात आले अाहे.त्याचबराेबर तपासणी माेहिम संपूर्ण उन्हाळ्यात चालणार असल्याचे एफडीएचे सहाय्यक अायुक्त संपत देशमुख यांनी सांगितले.

Web Title: FDA looks at non-licensed juice sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.