शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विना परवाना चहा विक्री करणा-या विक्रेत्यांनंतर त्यांना साहित्य पुरवणाऱ्यांवरही एफडीएची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 16:06 IST

येवले अमृततुल्य, साईबा अमृततुल्य तसेच प्रेमाचा चहा यांच्यावर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देविना परवाना चहा विक्री करणा-या अमृततुल्य व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध एफडीएची धडक मोहिम

पुणे: विना परवाना चहा विक्री करणा-या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए)कारवाई करण्यात आली.मात्र,विना परवाना चहा विक्री करणा-या व्यावसायिकांना चहा तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याची विक्री करणा-या दुकानदारांवरही एफडीएकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.चिक्की उत्पादकांनंतर एफडीएने चहा विक्रेत्यांकडे आपला मोर्चा वळविल्याचे बोलले जात आहे.पुणे शहरात विना परवाना किंवा विना नोंदणी चहा विक्री करणा-या अमृततुल्य व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध एफडीएने धडक मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत येवले अमृततुल्य, साईबा अमृततुल्य तसेच प्रेमाचा चहा यांच्यावर कारवाई करण्यात आली.तसेच विना परवाना विक्री करणा-यांना तात्काळ उत्पादन थांबविण्याचे आणि विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले.एफडीएने सुमारे महिना भरापूर्वी लोणावळा परिसरातील चिक्की उत्पादकांविरोधात मोहिम सुरू केली होती. सर्व चिक्की उत्पादकांना नियमांचे पालन करण्याबाबत एफडीएने नोटीसा बजावल्या. त्यानुसार संबंधितांनी आपल्यात आवश्यक बदल करून कायद्याचे पालन करण्यास सुरूवात केली. आता चहा विक्रेत्यांविरोधात एफडीएने मोहिम सुरू केली आहे. एफडीएचे पुणे विभागीय सह आयुक्त संजय शिंदे म्हणाले, चहासाठी लागणारी चहापत्ती व इतर साहित्याची विक्री करणारे विक्रेते त्यांनी चहाचा व्यावसाय करणा-यांकडे परवाना आहे किंवा नाही. हे तपासूनच आपल्याकडील मालाची (चहा साहित्य) विक्री करणे आवश्यक आहे. चहापत्ती विक्रेते काही चहाची विक्री करणा-या व्यावसायिकांना थेट दुकानात चहा साहित्य पोहच करतात. त्यामुळे संबंधितांकडे परवाना असल्याची खात्री करूनच चहाच्या सहित्याची विक्री करावी. विना परवाना चहा विक्री करणा-यांना आवश्यक साहित्याची विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. येवले अमृततुल्य,साईबा अमृततुल्यबरोबरच गुरूवार पेठेतील प्रेमाचा चहावरही कारवाई करून त्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. प्रेमाचा चहाच्या मालकांनी एफडीएकडे दंडाची रक्कम भरली आहे.

टॅग्स :PuneपुणेFDAएफडीए