मुलीची छेड का काढली, असे विचारणाऱ्या वडिलाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:11 IST2021-02-08T04:11:40+5:302021-02-08T04:11:40+5:30

राजगुरुनगर : मुलीस शिव्या का दिल्या तसेच छेड का काढली, म्हणून विचारणाऱ्या वडिलानाच आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना ...

The father, who asked why the girl was molested, was beaten | मुलीची छेड का काढली, असे विचारणाऱ्या वडिलाला मारहाण

मुलीची छेड का काढली, असे विचारणाऱ्या वडिलाला मारहाण

राजगुरुनगर : मुलीस शिव्या का दिल्या तसेच छेड का काढली, म्हणून विचारणाऱ्या वडिलानाच आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना खरपुडी (ता. खेड) येथे घडली आहे.

अशोक ज्ञानेश्वर बरबटे (वय ४५, रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड) यांनी या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलीला कलाबाई सर्जेराव बरबटे (रा. खरपूडी, ता. खेड) यांनी शिवीगाळ केली. ती का केली अशी विचारना त्यांनी विचारल्याने अधिक सर्जेराव बरबटे, विठ्ठल सर्जेराव बरबटे, ज्ञानेश्वर सर्जेराव बरबटे (सर्व रा. खरपुडी) यांनी अशोक बरबटे यांना शिवीगाळ तसेच दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात बरटडे हे जखमी झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुदाम घोडे करीत आहे.

Web Title: The father, who asked why the girl was molested, was beaten