शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पिता-पुत्राची जोडी एसटीत...!; पुण्यातील वीर यात्रेने पूर्ण केली एकत्र काम करण्याची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 12:17 IST

विविध क्षेत्रांमध्ये पिता-पुत्रांच्या जोड्या अनेकदा पाहायला मिळतात. अशीच आगळीवेगळी जोडी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वीर यात्रेनिमित्त सोडलेल्या जादा बसमध्ये जुळून आली.

ठळक मुद्देवीर यात्रेनिमित्त अशोक व अमोल माळशिकारे या पिता-पुत्रांनी एकाच बसमध्ये केले कामदोघांनाही एकाच गाडीमध्ये काम करण्याची इच्छा होती, त्यासाठी नियोजन केले : पृथ्वीराज भुताळे

पुणे : विविध क्षेत्रांमध्ये पिता-पुत्रांच्या जोड्या अनेकदा पाहायला मिळतात. अशीच आगळीवेगळी जोडी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वीर यात्रेनिमित्त सोडलेल्या जादा बसमध्ये जुळून आली. वडील चालक, तर मुलगा वाहक असून यात्रेनिमित्त दोघांना एकाच बसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. एसटीतर्फे वीर यात्रेनिमित्त ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान जादा गाड्या सोडल्या होत्या. या गाड्यांमध्ये अशोक व अमोल माळशिकारे या पिता-पुत्रांनी एकाच बसमध्ये काम केले. अमोल यांचे वडील बारामती आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत, तर अमोल हे सासवड आगारात वाहक. दोघेही बारामती येथे राहात असून, तेथूनच ते आपापल्या आगारांत कामाला जातात. वडील लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अमोल यांनी व्यक्त केली होती. मात्र, गाड्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे हा योग जुळून येत नव्हता. वीर यात्रेमुळे त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. दोघांना एकाच बसमध्ये बारामती ते कोंढे हा मार्ग दिला होता. एकाच बसमध्ये अशा प्रकारे वडील व मुलाने सेवा दिल्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. अशोक माळशिकारे हे २८ वर्षांपासून एसटीत कार्यरत आहे. अमोल हे तीन वर्षांपासून वाहक म्हणून कार्यरत आहे. दोघांनाही एकाच गाडीमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी नियोजन केल्याचे सासवडचे आगारप्रमुख पृथ्वीराज भुताळे यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळBaramatiबारामतीPuneपुणे