शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या गोळ्याला बापाने वाऱ्यावर सोडले; पोलिसांनी आकाशपाताळ एक करून पुन्हा ''त्याला '' गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:18 IST

आई वडिलांच्या घरगुती भांडणामध्ये अशाप्रकारे चिमुकल्याला वाऱ्यावर सोडल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. 

पुणे : रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु असताना चिमुकल्याचा रडण्याचा आवाज रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणाला ऐकू आला. आवाजाच्या दिशेने तो गेला असता मंदिराच्या पायरीवर त्याला अंदाजे दीड ते दोन वर्षांचा मुलगा दिसला. आई वडिलांच्या घरगुती भांडणामध्ये अशाप्रकारे चिमुकल्याला वाऱ्यावर सोडल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. ही हृदयद्रावक घटना कर्वेनगरमध्ये घडली आहे. 

वारजे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित सुर्यवंशी (वय 24 .रा. थोरात कॉलनी, कर्वेनगर ) हा तरुण एका कामा निमित्ताने रात्री दोन वाजता कर्वेनगर मधील महालक्ष्मी मंदिरात जवळुन जात असताना एक दोन वर्षे मुलांचा रडण्याचा आवाज ऐकला आणि मंदिरांचा पायरीवर एक मुलगा (चंद्रशेखर साधुचरण पुष्टी वय 2 ,रा. साई ज्योत कॉलनी, रहाटणी ) मोठ्याने रडत प्रचंड थंडीने गारठलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत प्रणितला दिसला. त्यावेळी प्रणित मुलाला घेऊन कर्वेनगरमधील चौकीत गेला आणि सर्व माहिती दिली. पोलिसांनी पुणे हद्दीत हरविल्याची माहिती घेण्यास सुरूवात केली असता कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर पिंपरी चिंचवड हद्दीत संपर्क साधला असता रहाटणीजवळ एक दोन वर्षे वयाचा मुलगा हरविल्याची तक्रार त्याच्या आईने दिल्याचे पोलिसांना कंट्रोल मार्फत समजण्यात आले. यावेळी वाकड पोलिस पण शोध घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बिटमार्शल अमोल पायगुडे, बाबासो नरळे, भास्कर खोत, भावेश सोडमिशे घटनास्थळी पोहचले आणि अनेक नागरिकांना उठवुन कोणाचा मुलगा झोपेत बाहेर गेला का ?याबाबत विचारणा केली. यावेळी स्थानिक नागरिक विभीषण मुंडे यांनी पोलिसांना मदत करत अनेक घरे पिंजुन काढली. पण मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांना पुणे हद्दीत हरविल्याची माहिती घेण्यास सुरूवात केली असता कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर पिपरी चिचंवड हद्दीत संपर्क साधला असता रहाटणी जवळ एक दोन वर्षे वयाचा मुलगा हरविल्याची तक्रार त्याचा आईने दिल्याचे पोलिसांना कंट्रोल मार्फत समजण्यात आले या वेळी वाकड पोलिस पण शोध घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर आधिक माहिती घेतली असता वारजे आणि वाकड पोलिसांनी घेतलेले फोटो बरोबर एकच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वारजे पोलिसांनी संबधित मुलाला वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी वाकड पोलिस चौकीत आईला पाहताच चंद्रशेखरने आईकडे जोरात धाव घेतली तेव्हा आईचा मायेचा बांध फुटला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले .आई वडिलांच्या घरगुती भांडणाचा दोन वर्षे मुलाची इतकी फरपट कोणालाही पाहणार नाही. यावेळी कर्वेनगर मधील सामाजिक कार्यकर्ते बिभीषण मुंडे तसेच पोलिस नाईक अमोल पायगुडे, बाबासो नरळे, भास्कर खोत, भावेश सोडमिशे आणि मुलाला उघड्यावर न सोडता माणुसकी जपणारा प्रणित सुर्यवंशी यांचे विशेष आभार मानले गेले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस