मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:11+5:302020-12-02T04:05:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी येथील मुलाकडुन मारहाण झालेल्या वडिलांचा मुत्यु झाल्याची घटना सोमवारी (दि ३०) ...

Father dies in child beating | मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी येथील मुलाकडुन मारहाण झालेल्या वडिलांचा मुत्यु झाल्याची घटना सोमवारी (दि ३०) घडली. प्रकाश रमेश जोरकर (वय २९) असे आरोपी मुलाचे नाव असून वेल्हे पोलिसांनी त्याला अटक केले आहे.

रमेश विठ्ठल जोरकर (वय ५५) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी जोरकर यांच्या पत्नी संगीता जोरकर यांनी फिर्याद दिली आहे.

वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी येथील रहिवाशी असलेले

रमेश विठ्ठल जोरकर (वय ५५) हे पत्नी व दोन मुलासह राहत होते. २५ नोव्हेंबरला रात्री ९ च्या सुमारास मुलगा प्रकाश जोरकर मित्रासोबत घरी आला. त्याने आईला जेवणाची ताटे बाहेर आणण्यास सांगितले. यावर वडील रमेश जोरकर रागवल्याने दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मुलगा प्रकाश याने वडील रमेश जोरकर यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. प्रकाशची सावत्र आई संगीता जोरकर, व त्याची

सख्खी आई शंकुतला जोरकर भांडणे सोडविण्यासाठी आल्या. मात्र, त्यांनाही प्रकाशने मारहाण केली. या घटनेत रमेश जोरकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील ससुन रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलगा प्रकाश रमेश जोरकर यांच्यावर वेल्हे पोलीसात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.

Web Title: Father dies in child beating