तळेगाव ढमढेरेत दोन मुलींसह वडिलांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:13 IST2021-03-25T04:13:03+5:302021-03-25T04:13:03+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र भुजबळ हे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासमवेत वानवडी (पुणे) येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी ...

तळेगाव ढमढेरेत दोन मुलींसह वडिलांची आत्महत्या
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र भुजबळ हे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासमवेत वानवडी (पुणे) येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी कोणाला काहीही न सांगता राजेंद्र हे आपल्या दीक्षा आणि ऋतुजा या दोन मुलींना घेऊन तळेगाव ढमढेरे येथे मूळगावी आले होते. दरम्यान, सायंकाळी गावातील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला राजेंद्र भुजबळ व त्यांच्या मुलींच्या चपला, मोबाईल पैसे पडल्याचे उत्तम यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ यासंदर्भात शिक्रापूर पोलिसांना कळवले. पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीत या तिघांचा शोध सुरू केला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो