चिमुकलीसह वडिलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST2021-05-21T04:12:21+5:302021-05-21T04:12:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : वडगाव सहाणी (ता.जुन्नर) येथे वडिलांनी सहा वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन विहिरीत ...

Father commits suicide with Chimukali | चिमुकलीसह वडिलांची आत्महत्या

चिमुकलीसह वडिलांची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

जुन्नर : वडगाव सहाणी (ता.जुन्नर) येथे वडिलांनी सहा वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१९) रात्री घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

विक्रांत विजय तांबोळी (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर साची ऊर्फ परी तांबोळी असे चिमुकल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस पाटील गणेश जेडगुले यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वडगाव सहाणी येथील एका विहिरीत कोणीतरी उडी मारली आहे व ग्रामस्थ विहिरीत शोध घेत आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. मात्र विहिरीत काही दिसत नसल्याने विहिरीत गळ टाकण्यात आला. विक्रांत तांबोळी यांच्या पॅंटमध्ये गळ अडकल्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र मुलीचा मृतदेह सापडत नसल्याने ग्रामस्थांनी विहिरीत पंप लावून पाणी बाहेर काढले. त्यानंतर मुलीचा मृतदेह हाती लागला. या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Father commits suicide with Chimukali