शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाला धडकून पिता-पुत्र गंभीर जखमी; कर्वेनगर उड्डाणपुलाचे रखडलेले काम कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:07 IST

काम चालू असलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाला धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देराजेंद्र इंगळे आणि दिनेश राजेंद्र इंगळे असे जखमी झालेल्या पिता-पुत्रांची नावेउड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास ४ वर्ष पूर्ण, त्यामुळे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ

कर्वेनगर : काम चालू असलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाला धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र इंगळे आणि दिनेश राजेंद्र इंगळे असे जखमी झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. दोघेही काल रविवार (दि. ४) रात्री अकराच्या सुमारास कोथरूड वरून वारजेच्या दिशेने जात असताना, वनदेवी मंदिर परिसर ओलांडल्यावर कर्वेनगर पोलीस चौकीसमोर आले असताना, दुचाकी चालवणाऱ्या दिनेश इंगळे यांचे नियंत्रण सुटल्याने, दुचाकी उड्डाणपुलाचे काम चालू असलेल्या पिलरला जोरात धडकली.अपघात झाल्यावर जोराचा आवाज झाल्याने कर्वेनगर पोलीस चौकीत हजर असलेले पोलीस नाईक बालारफी शेख, पोलीस शिपाई संतोष गवारी, ज्ञानेश्वर कुंभार यांनी तत्काळ बाहेर धाव घेतली असता, त्यांना गंभीर अपघाताचे चित्र दिसले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती, घटनास्थळी रक्त पहायला मिळत होते. त्या परिस्थितीत पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. त्यानंतर प्रथमोपचार करून, ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोघेही गंभीर जखमी झालेले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे.या उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास ४ वर्ष पूर्ण होत आहेत. दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण करण्याकरिता ठेकेदार कंपनी सिम्प्लेक्सला अडीच वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यातील एक पूल देखील अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. 

टॅग्स :karve nagar policeकर्वे नगर पोलीसPuneपुणे