पवईत मलनि:सारण वाहिनी दुरुस्तीदरम्यान तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 09:25 PM2018-01-01T21:25:10+5:302018-01-01T21:25:20+5:30

मुंबई : पवई आयआयटीसमोर पालिकेच्या मलनि:सारण वाहिनी दुरुस्तीच्या कामादरम्यान जेसीबीचा वरचा भाग पाच कामगारांच्या अंगावर कोसळल्याची घटना सोमवारी घडली. यामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Puayit Malani: Three people died during the repair of Saran Vahini and both of them are worried | पवईत मलनि:सारण वाहिनी दुरुस्तीदरम्यान तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

पवईत मलनि:सारण वाहिनी दुरुस्तीदरम्यान तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

googlenewsNext

मुंबई : पवई आयआयटीसमोर पालिकेच्या मलनि:सारण वाहिनी दुरुस्तीच्या कामादरम्यान जेसीबीचा वरचा भाग पाच कामगारांच्या अंगावर कोसळल्याची घटना सोमवारी घडली. यामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. खासगी ठेकेदाराकडे पालिकेने कामाची जबाबदारी सोपविली होती. या प्रकरणी ठेकेदारासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पवई आयआयटी समोर पालिकेकडून मलनि:सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते.

दुरुस्तीसाठी 25 फुटांचा खड्डा खणण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान सायंकाळी 7च्या सुमारास जेसीबीचा वरचा भाग पाच कामगारांवर कोसळला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर झाल्याची घटना घडली. खासगी ठेकेदाराकडे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

पाचही जणांना घाटकोपरच्या राजवाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. तर पोरट सिंग (47), रामनाथ सिंग (48) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा करण्यात येत असल्याचेही पोफळे यांनी सांगितले. मृतांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नसल्याचे पोफळे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Puayit Malani: Three people died during the repair of Saran Vahini and both of them are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई