पित्यासह तिघांना खूनप्रकरणी जन्मठेप
By Admin | Updated: January 18, 2015 01:22 IST2015-01-18T01:22:00+5:302015-01-18T01:22:00+5:30
जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडिलांसह दोन मुलांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पित्यासह तिघांना खूनप्रकरणी जन्मठेप
बारामती : खडकी (ता. दौंड) येथील दोघा जणांच्या खूनप्रकरणी, तसेच तिघा जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडिलांसह दोन मुलांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या सुनावणीसाठी आरोपींच्या नातेवाइकांसह परिसरातील अनेकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती.
अनिल विठ्ठल काळे व त्यांची दोन मुले सचिन आणि उमेश काळे (रा़ शितोळेवस्ती, खडकी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत़ या प्रकरणात जालिंदर जयवंत काळे आणि गणेश ऊर्फ बापूसाहेब काळे यांचा खुन झाला होता़ ही घटना २९ आॅक्टोंबर २०१२ रोजी दौंड तालुक्यातील खडकी येथील शितोळेवस्तीमध्ये घडली होती़
दौंडमध्ये गाजलेल्या या खुनप्रकरणी सत्र न्यायाधीश आऱ डी़ सावंत यांनी तिघांना दोषी ठरविले होते़ त्यानंतर शिक्षा संदर्भात आज दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यात आला़ जिल्हा सरकारी वकील विजयसिंह मोरे पाटील म्हणाले, की या गुन्ह्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, तिघांच्या खुनाचा प्रयत्न झाला़
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सावंत म्हणाले, की आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला, तरी तो दुर्मिळातील दुर्मिळ स्वरुपाचा नाही. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देता येणार नाही. तिघा पिता-पुत्रांना आजन्म कारावासाची शिक्षा योग्य राहील.
(प्रतिनिधी)