खेड तालुक्यात अडीच लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भाग्य

By Admin | Updated: January 23, 2017 02:34 IST2017-01-23T02:34:16+5:302017-01-23T02:34:16+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. खेड तालुक्यात

Fate of candidates who will be able to get two and a half lakh voters in Khed taluka | खेड तालुक्यात अडीच लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भाग्य

खेड तालुक्यात अडीच लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भाग्य

दावडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. खेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट व पंचायत समितीचे १४ गण असून, २ लाख ४५ हजार ३९ मतदार आहेत. हे अडीच लाख लोक उमेदवाराचे भाग्य ठरविणार आहेत.
तालुक्यात पुरुष मतदार १ लाख २८ हजार ९६९ आहेत. तर १ लाख १६ हजार ७० स्त्री मतदार आहेत. पंचायत समितीचे गण मतदारसंख्या पुढील प्रमाणे : नायफड (१८००७), वाशेरे (१९ हजार ५२४), वाडा (१९ हजार ७१०), कड़ुस (१७ हजार ४७६), पाईट (१९ हजार ८२०), पिंपरी बु. (१७ हजार ६८१), नाणेकरवाडी (९ हजार ६८१), महाळुंगे (११ हजार ९५७), चऱ्होली (१५ हजार ९५८), कुरुळी (१४ हजार १६१), पिंपळगाव तर्फे खेड (१९ हजार ८६८), रेटवडी (२१ हजार ३१४), सांडभोरवाडी (२१ हजार ३१८), काळुस (१८ हजार ५६४). आचारसंहिता लागू झाल्यापासून तालुक्यातील प्रत्येक गणातील व गटातील इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर होण्याअगोदरच आपल्यालाच तिकीट मिळणार आहे, असे मतदारांना सांगत आहे. काही इच्छुक उमेदवार आपल्या गटातील युवकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करून रात्रभर अपडेट राहत आहेत.
खेड तालुका राजकीयदृष्टया अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा निवडणुकीदरम्यान या तालुक्याच्या राजकारणाकडे लक्ष लागून राहते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच संबंधित गट व गणातील इच्छुकांनी आपले दौरे सुरु केले आहेत. सर्वसामान्यांना कधीही न दिसणारे व बंद काचेच्या आलिशान वाहनातून फिरणारे इच्छुक मात्र आता जमिनीवर आले आहेत. सर्वसामान्यांपुढे हात जोडून पाया पडत आहेत. अनेक इच्छुकांची फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. कधीतरी मतदारसंघात दिसणारे नेते इच्छुक दररोज दिवस सुरू होताच गावागावात धुराळा उडवत जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Fate of candidates who will be able to get two and a half lakh voters in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.