मतपेटीत बंद झाले ६३ उमेदवारांचे भवितव्य
By Admin | Updated: April 3, 2015 03:23 IST2015-04-03T03:23:48+5:302015-04-03T03:23:48+5:30
संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेल्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला यंदा पहिल्यांदाच

मतपेटीत बंद झाले ६३ उमेदवारांचे भवितव्य
वाकड : संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेल्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला यंदा पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जावे लागले. २१ जागांसाठी घेण्यात आलेली मतदान शांततेत पार पडले. मात्र, एकाच वेळी २१ उमेदवारांना मतदान करायचे असल्याने बहुतेक मतदान केंद्रावर गोंधळ उडाला.
या निवडणुकीद्वारे ६३ उमेदवारांचे भवितव्य काल मतपेटीत बंद झाले शनिवारी ४ एप्रिल रोजी कासारआंबोली गावात नीकाल लागणार आहे. शेतकरी विकास पेनलचे २१ उमेदवार ,शेतकरी परिवर्तन पेनलचे १७ उमेदवार यांच्यासह २३ अपक्ष उमेदवार या निवडणुकीतून आपले नशीब अजमावीत आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत ४२ मतदान केंद्रांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
वाकड, हिंजवडी, थेरगाव, पुनावळे आदि मतदान केंद्रावरील सकाळच्या तुलनेत दुपारनंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली.