भांडणात मध्यस्थी केल्यामुळे तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST2021-05-25T04:11:31+5:302021-05-25T04:11:31+5:30

पुणे : भांडणात मध्यस्थी केल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जीवघेणा हल्ला केला. ही घटना २२ ...

Fatal attack on a youth for mediating a dispute, three arrested | भांडणात मध्यस्थी केल्यामुळे तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

भांडणात मध्यस्थी केल्यामुळे तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

पुणे : भांडणात मध्यस्थी केल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जीवघेणा हल्ला केला. ही घटना २२ मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास विश्रांतवाडीतील आदर्श इंद्रिरानगरमध्ये घडली. याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

इरफान सय्यद (वय २६) , रियाज मुजावर, मोहसीन शेख (सर्व रा. आदर्श इंदिरानगर, येरवडा ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रशांत अनिल परदेशी (वय २०, रा. आळंदी रस्ता, येरवडा ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रशांतचा मित्र विष्णू मुदलीयारला मारहाण करीत होते. त्यामुळे प्रशांतने भांडणात मध्यस्थी केली. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने प्रशांतला धक्का देऊन खाली पाडले. शिवीगाळ करून लाकडाने मारहाण करीत सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीररीत्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.

Web Title: Fatal attack on a youth for mediating a dispute, three arrested