शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:22 IST

पणदरे ग्रामपंचायतीतील प्रकार : सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांचे चार दिवसांपासून आंदोलन

सांगवी : पणदरे (ता. बारामती) येथील ग्रामसेवक यांनी शासनाच्या विविध योजना व ग्रामपंचायतीमधील केलेला भ्रष्टाचार उघडकीस येऊनही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे गेल्या चार दिवसांपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.पणदरे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अफरातफर, गैरव्यवहार, अपंग कल्याण ३ टक्के निधी, महिला बालकल्याण १० टक्के निधी, मागासवर्गीयांच्या १५ टक्के निधी, मागील अनुशेष खर्च न करणे, दोन वेळा शौचालय देणे व इतर प्रकरणात अफरातफर, गैरव्यवहार, वारंवार झालेल्या भ्रष्टाचाराचे एकूण १५० पुरावे दिले आहेत. या प्रकरणांचा चौकशी अहवाल येऊनही गटविकास अधिकारी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने आमरण उपोषणास बसल्याचे विक्रम कोकरे यांनी सांगितले.शनिवारी सायंकाळी उपोषणस्थळी पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी भेट दिली.दरम्यान, कोकरे यांच्या उपोषणाला राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रासपच्यावतीने देण्यात आला आहे. शनिवारी (दि. १८) रासपचे बापूराव सोलनकर, संपतराव टकले, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष निखिल देवकाते, दिलीप कोकरे आदींनी कोकरे यांची भेट घेतली.गटविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईची मागणी...बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी पॉकेट संस्कृतीची जोरदार अंमलबजावणी राबविल्यामुळे कारवाई थंडावत आहेत. भ्रष्टाचार, गैरव्यवहार करणाºयांच्या मागे ठामपणे उभे राहून, मोकाट सोडून दिले जात असल्याने चोरांचा बाजार झाला आहे, असा आरोप विक्रम कोकरे यांनी केला आहे. शासनपत्रक ४ जानेवारी २०१७ नुसार पणदरे ग्रामसेवक यांच्या चौकशीच्या प्रकरणाला जाणूनबुजून विलंब केल्याने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही कोकरे यांनी केली आहे.डॉ. उमेश नाईक यांना निलंबित करा...सिल्व्हर ज्युबिली येथील डॉ. उमेश नाईक यांनी कोकरे यांची परिस्थिती खालावली असल्याचे सांगितल्याने शनिवारी (दि. १८) मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. बारामती सिल्व्हर ज्युबिलीत वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या दबावाला बळी पडून वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून खोटा अहवाल सादर केला. कोणत्याही प्रकारचा अहवाल न दाखवता तब्येत बिघडली असल्याची तोंडी माहिती दिली. तसेच, रात्री-बेरात्री आहे त्या ठिकाणी चालत माघारी पाठवण्यात आले. मात्र खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता काहीही झाले नसल्याचे निष्पन्न झाले, असा आरोप विक्रम कोकरे यांनी केला आहे. यामुळे सिल्व्हर ज्युबिली येथे खोटी तपासणी केलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश नाईक यांचे निलंबन करण्यात यावे, अशीही मागणी कोकरे यांनी केली आहे.कोहिनकर यांनी नेमलेली समिती निर्णय घेईलपणदरे ग्रामसेवक यांनी मागील अनुशेष खर्च केलेला आहे. यासाठी विस्तार अधिकारी लाखे व चांदगुडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचे अहवाल कोकरे यांना मान्य नव्हते. त्यानंतर पुन्हा दौंडच्या विस्तार अधिकाºयांची नेमणूक केली असता त्यांचेही अहवाल त्यांना मान्य झाले नाहीत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहीनकर यांनी नेमलेली समिती त्यावर निर्णय घेईल, असे बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार